शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

गुढीपाडवा : नववर्ष शोभायात्रेसाठी तरुणी-महिलांची खास तयारी, मराठमोळी परंपरा जपत नटूनथटून नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2025 18:03 IST

1 / 11
महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा हा सण फार उत्साहामध्ये तसेच जल्लोषामध्ये साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या चेहर्‍यावरील तेज काही औरच असते.
2 / 11
पाडवा म्हणजे नटून थटून मराठमोळा साज परिधान करण्याचा हक्काचा दिवस. नाकात नथ, कपाळाला चंद्रकोर, कंबरेला पट्टा आणि हातामध्ये बांगड्या. सगळंच अगदी ऐटीत.
3 / 11
पुणे, मुंबई , नाशिक, ठाणे, डोंबिवली, गिरगाव इतरही अनेक शहरांमध्ये शोभायात्रांचे आयोजन केले जाते. या यात्रांमध्ये शहरातील लोक हजाराच्या संख्येने सहभागी होतात.
4 / 11
महिलांचा उत्साह या दिवशी दांडगा असतो. महिलांची मोटर रॅली पाहायला मिळते. बुलेटसारख्या गाड्या घेऊन महिला या रॅलीमध्ये सहभागी होतात.
5 / 11
शोभायात्रांची खरी शोभा म्हणजे ढोल ताशा पथक. या पथकांमध्येही महिला आवर्जून सहभागी होतात. ढोल वाजवतानाचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावर दिसतो.
6 / 11
या दिवशी मिळणारा मोठा मान म्हणजे ध्वजधारी. हातामध्ये ध्वज घेऊन तो ढोल आणि ताशांच्या गजरात नाचवला जातो.
7 / 11
लहान मुलीही या शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होतात. छान सुंदर कपडे घालतात. काही जणी साडी नेसतात. शोभायात्रेची शान वाढवतात.
8 / 11
शोभायात्रेतील पालखी बरोबर महिला भोई असतातच. मात्र हातात टाळ आणि झांज घेऊनही महिला या यात्रेमध्ये सहभागी होतात. टाळांच्या गजरात धुंद होतात.
9 / 11
या दिवशी अनेक ठिकाणी ऑन ड्यूटी असणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांचेही कौतुक केले जाते. महिला कर्मचार्‍यांची पारंपारिक पद्धतीने ओटी भरली जाते.
10 / 11
गुढीपाडव्याला अनेक जणी महिलांना त्याच्यातील रण रागिणी जागृत करण्यासाठी प्रेरित करणारा पोशाखही घालतात.
11 / 11
विविध सामाजिक संदेश देणार्‍या रॅली पाडव्याला प्रत्येक शहरातून निघतात. महिलांच्या समस्यांबाबतही जागृकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.
टॅग्स :gudhi padwaगुढीपाडवाWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्रshobha yatraशोभायात्राfashionफॅशन