1 / 8सोन्याच्या किमती सध्या खूपच जास्त वाढलेल्या आहेत. पण तरीही गुढीपाडव्याचा मुहूर्त असा असतो की त्यावेळी बहुतांश लोक जमेल तसे थोडेफार का होईना पण सोने घेतातच. 2 / 8तुम्हालाही सोन्याची खरेदी करायची असेल पण त्यासाठीचं बजेट मात्र थोडं कमी असेल तर या काही कमी वजनाच्या आणि कमी किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. 3 / 8पहिला दागिना आहे नथ. मोत्याची सोन्यात जडवलेली नथ अगदी १- २ ग्रॅम एवढ्या वजनातही मिळेल. 4 / 8कानातल्या मोत्याच्या कुड्याही कमी वजनात तयार करून घेता येतात. त्यासाठी बरेच कमी सोने लागते. 5 / 8अनेक जणींना पारंपरिक वेशभुषा केल्यावर बुगड्या घालण्याची हौस असते. या बुगड्याही तुम्ही कमी सोन्यामध्ये घडवून घेऊ शकता. 6 / 8मोरणी किंवा नथनी असे डेलीवेअरचे प्रकारही तुम्ही कमी वजनाच्या सोन्यात करून घेऊ शकता. 7 / 8दोन ते तीन ग्राम वजनात रोजच्या वापरासाठी खूप छान नाजूकशी अंगठी मिळू शकते. त्याचाही विचार पाडव्याच्या मुहुर्तावर सोने खरेदी करताना नक्की करा. 8 / 8ठुशी किंवा कोल्हापुरी साज हा दागिना ४ ते ५ ग्रॅममध्ये येतो. त्यामुळे बजेट जर थोडे जास्त असेल तर त्याचाही विचार करायला हरकत नाही.