सणासुदीला पांढरे केस बरे नाही दिसत? नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ कालवून लावा, ५ मिनिटांत केस काळेभोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 17:59 IST
1 / 5केसांना काळे (Grey Hairs Solution)करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे उपाय करत असाल पण बाजारात मिळणारी बरीच उत्पादनं तात्पुरता परिणाम दाखवतात. हेअर कलरचा अतिवापर केसाचं नुकसान करू शकतो.(How To Blacken Hair Instantly)2 / 5काही सामान्य घरगुती उपाय वापरल्यास तुम्हाला नैसर्गिकरित्या दाट, काळे केस मिळण्यास मदत होईल.नारळाचं तेल सर्वांच्याच घरी असतं नारळाच्या तेलात काही पदार्थ मिसळून लावल्या केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यास मदत होईल. (Best Solution For Grey Hairs)3 / 5आवळा पावडर केसांना काळे बनवण्यास मदत करू शकते. आवळा पावडरमध्ये व्हिटामीन सी आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे केस नैसर्गिकरित्या काळे राहण्यास मदत होते. याशिवाय केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहण्यासही मदत होते. हा उपाय प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारे काम करतो4 / 5जर तुम्हाला आपले केस नैसर्गिकरित्या काळे ठेवायचे असतील तर काळे तीळ वापरणंही उत्तम ठरेल. १ चमचा काळे तीळ ३ ते ४ चमचे नारळाच्या तेलात घालून रात्रभर भिजू द्या. सकाळी हे तेल कोमट करून डोक्यावर मसाज करा.5 / 5एक कप नारळाच्या तेलात १० कढीपत्ते घाला आणि हलक्या आचेवर काळे होईपर्यंत गरम करत राहा. नंतर थंड झाल्यानंतर केसांवर वापरा. हे मिश्रण केसांना २ ते ३ तास लावून ठेवा त्यानंतर शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा.