1 / 8'दिलबर गर्ल' नोरा फतेही तिच्या डान्सिंग मुव्हजसाठी प्रसिद्ध आहे. ती सध्या कतारमध्ये होणाऱ्या फिफा वर्ल्ड कप २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करते आहे. अलीकडेच तिने तिथं अप्रतिम परफॉर्मन्स दिला, ज्यासाठी तिने असे कपडे परिधान केले होते, ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. तिने तिच्या लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 2 / 8ती नेहमी तिच्या दिलखेचक अदाकारांनी सर्वांना मंत्रमुग्ध करून सोडते. मात्र, यावेळी तिने परिधान केलेल्या पोशाखाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय. हिऱ्यांनी नखशिखांत बनलेल्या ट्रान्सपरंट गाऊनमध्ये नोरा अप्सरा दिसत होती. या ड्रेससोबतच तिने पिंक रंगाचा श्रग देखील घेतला होता. 3 / 8फिफा फॅन फेस्टीव्हलमध्ये 'ओ साकी साकी' आणि 'नाच मेरी रानी' या गाण्यावर नोरा डान्स करताना दिसली. नोराच्या डान्सचं कौतुक झालं. यासह तिने भर स्टेजवर भारताचा तिरंगा हातात धरून जय हिंदच्या घोषणा दिल्या.यावरून तिचं भारतप्रेमही दिसून आलं.4 / 8तिने परिधान केलेला ड्रेस फॅशन डिझायनर फाल्गुनी शेन अँड पीकॉक यांच्या कलेक्शनमधून निवडण्यात आला आहे. या संपूर्ण ड्रेस हिऱ्यांनी सजवण्यात आला होता. त्या ड्रेसमध्ये नोरा हिऱ्यांसारखी चमकत होती.5 / 8नोराच्या या सिल्व्हर स्टनिंग ड्रेसवर सिल्व्हर सिक्विन जोडले गेले होते. नोरा या ड्रेसमध्ये खूपच हॉट दिसत होती. तिने यावर पिंक लॉन्ग सॅटिन फ्रिल श्रग कॅरी केलाय.6 / 8नोराने याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, या फोटोवर फॅन्सने कमेंट्सची बरसात केलीय. काही युजर्सनी या फोटोवर 'हा ड्रेस आहे की पडदा अशी कमेंट केली आहे'. तर काहींनी तू खूपच सुंदर दिसत आहेस अशी कमेंट केली आहे.7 / 8हा लूक पूर्ण करण्यासाठी नोराने खूपच सिम्पल मेकअप केला होता. यावेळी तिने पिंक रंगाची लिपस्टिक लावली होती तर यावेळी तिने तिचे केस मोकळे सोडणे पसंत केले.8 / 8नोराची करियरची सुरुवात खडतर जरी असली तरी, आता ती एक स्टार झालीय. तिला स्टाईल आयकॉन देखील म्हटले जाते. तिने आजतागायत अनेक शोमध्ये परिक्षकाची भूमिका साकारली असून, अनेक अल्बममध्ये डान्स केला आहे.