1 / 8आपल्यापैकी अनेकांना दुपारच्या जेवणात दही खाण्याची सवय आहे. परंतु, पावसाळा सुरु झाल्यामुळे दही खाण्यास किंवा त्याचे विरजण लावताना त्रास होतो. दही घरी सेट करायचे असेल तर वातावरणातील गारव्यामुळे ते जमत नाही.(How to set curd in monsoon) 2 / 8बाजारातून विकत आणलेले दही आणि घरी जमवलेल्या दह्याच्या चवीत जास्त फरक असतो. दह्याचा डबा सिलबंद असल्यामुळे ते कधी कधी आंबट लागते किंवा त्यात पाणी राहते. जर आपणही घरात दह्याचे विरजण जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर सोपी पद्धत लक्षात ठेवा. (Monsoon curd setting tips)3 / 8दही जमवण्यासाठी दूध चांगले गरम करुन घ्या. ज्यामुळे त्यातील पाणी आणि अतिरिक्त पदार्थ निघून जातील. 4 / 8दूध कोमट झाले की नाही ते तपासा. यामध्ये १० सेकंद आपला बोट ठेवून बघा. ज्यावरुन दुधाचे तापमान योग्य आहे की, नाही कळेल. 5 / 8दुधामध्ये १ ते २ चमचे तयार फ्रेश दही घाला. स्टार्टर असलेले दही आंबट नसावे. दही घातल्यानंतर ते चांगले मिसळा, ज्यामुळे ते दुधात व्यवस्थित मिसळेल. 6 / 8ज्या भांड्यात दूध घेतले आहे ते भांडे ॲल्युमिनियम फॉइलने किंवा जाड झाकणाने चांगले झाकून ठेवा. आत उष्णता टिकून राहिल्यावर दही चांगले जमेल. 7 / 8प्रेशर कुकरमध्ये अर्धा ग्लास पाणी घालून गॅसवर ठेवा. पाणी उकळल्यानंतर त्यात दह्याचे भांडे ठेवा. कुकरची शिट्टी लावू नका. वाफेवर दही सेट होईल. 8 / 8१५ मिनिटानंतर कुकरचे झाकण काढा. दह्याचे भांडे बाहेर काढून थंड होण्यास ठेवा. तयार होईल जाडसर घट्ट दही.