शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

गाळणी आणि सिंक स्टेनर पटकन होतात खराब - बदलू नका करा सोपा घरगुती उपाय, ५ मिनिटांत दिसतील नव्यासारखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2026 16:59 IST

1 / 6
स्वयंपाकघरात रोज वापरली जाणारी गाळणी आणि सिंक स्टेनर काही दिवसांतच तेलकट आणि चिकट दिसू लागतात. त्याला बरेच कणही चिकटलेले असतात. गाळणीच्या छिद्रांमध्येही कण अडकलेले असतात. चहा गाळताना गाळणीत अडकलेली पावडर, भाजी धुताना स्टेनरमध्ये साचलेला कचरा साध्या साबणाने घासूनही पूर्णपणे स्वच्छ होत नाही.
2 / 6
अशा वेळी करता येईल असा अगदी सोपा उपाय आहे. नवीन गाळणी आणायची काहीच गरज नाही. अगदी सोपा आणि साधा उपाय करुन गाळणी आणि स्टेनर नव्यासारखे करता येतात.
3 / 6
हा उपाय म्हणजे गाळणी किंवा स्टेनर थोडा वेळ गॅसवर धरुन त्यातील घाण जाळणे. प्रथम गाळणी पूर्णपणे कोरडी असावी. नंतर चिमटा किंवा पकडणीच्या साहाय्याने ती गॅसवर धरावी. काही सेकंदांत साचलेली तेलकट घाण, चहाची पावडर किंवा अडकलेले कण जळून काळे होतात.
4 / 6
गॅसवरुन काढल्यानंतर ती पूर्ण थंड होऊ द्यावी. थंड झाल्यावर ब्रश किंवा स्क्रबरने हलकेच घासले की जळलेली घाण सहज निघून जाते. पाण्याने धुतल्यावर साबणाने स्वच्छ करा आणि पाण्यात बुचकळून काढा.
5 / 6
हा उपाय करताना काही काळजी घेणेही आवश्यक आहे. प्लास्टिकचे हँडल असेल तर ते आगीपासून दूर ठेवावे. जास्त तीव्र आचेवर जास्त वेळ धरल्यास धातू कमकुवत होऊ शकतो, त्यामुळे मध्यम आच पुरेशी असते. तसेच हा उपाय करताना चिमटा वापरल्यास सुरक्षितता राहते.
6 / 6
हा उपाय करताना काही काळजी घेणेही आवश्यक आहे. प्लास्टिकचे हँडल असेल तर ते आगीपासून दूर ठेवावे. जास्त तीव्र आचेवर जास्त वेळ धरल्यास धातू कमकुवत होऊ शकतो, त्यामुळे मध्यम आच पुरेशी असते. तसेच हा उपाय करताना चिमटा वापरल्यास सुरक्षितता राहते.
टॅग्स :Cleaning tipsस्वच्छता टिप्सHome remedyहोम रेमेडीkitchen tipsकिचन टिप्सSocial Viralसोशल व्हायरल