1 / 8अतिशय मानाचा समजला जाणारा अकादमी पुरस्कार सोहळा म्हणजेच ऑस्कार २०२३ नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पहिल्यांदाच चक्क ऑस्करच्या दरबारी हजेरी लावली. तिचा व्हाईट कार्पेटवरील लूक सोशल मिडीयावर व्हायरल झाला. मुख्य म्हणजे तिच्या मानेवरील टॅटूने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं(Deepika Padukone shows off new neck tattoo in Oscars look. Here's what it says).2 / 8लॉस एंजलिसमध्ये आयोजित केलेल्या या ९५व्या ऑस्कर सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोणने यंदाच्या ऑस्कर सोहळ्यात विशेष स्थान पटकावले आहे. ऑस्कर प्रेझेंटर्स दीपिका पादूकोणची निवड करण्यात आली होती. 3 / 8दीपिकाची फॅशन नेहमीच ऑन-पॉईंट असते. Louis Vuitton च्या जेट ब्लॅक ऑफ शोल्डर गाऊनमध्ये ती डॉलप्रमाणे दिसत होती. तिने तिचा लूक डायमंड नेकलेस आणि मोत्याच्या ब्रेसलेट-रिंगसह पूर्ण केला. यासह केसांचे मिडल पार्टेड स्लीक लो-बन बनवला आहे. 4 / 8दीपिकाने या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये काही किल्लर पोझ देत फोटो काढले असून. तिने हे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. तिचे हे फोटो पाहून, तिच्या मानेवर नक्की कोणता टॅटू आहे? असा प्रश्न चाहत्यांच्या मनामध्ये उद्भवला आहे.5 / 8दीपिकाने स्वत:च्या ब्रँडच्या नावाचा टॅटू मानेवर तयार केला आहे. यात 82.E असे लिहिले आहे. दीपिकाने काही महिन्यांपूर्वी एक ब्यूटी ब्रँड सुरु केला आहे. ज्याचे नाव 82 degrees East असे ठेवण्यात आले. त्याचाच टॅटू तिने तिच्या कानाच्या मागे काढला आहे. 6 / 8त्वचेची काळजी घेणं अधिक महत्त्वाचे आहे आणि त्यामुळेच तिने हा ब्रँड सुरू केलं असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.7 / 8प्रिमियम आणि हाय परफोर्मेंस उत्पादने जनतेपर्यंत पोहचावे, यासाठी तिने या ब्रँडची स्थापना केली. ब्युटी प्रोडक्ट्स लाँच केल्यानंतर दीपिका देखील उद्योजक बनली आहे.8 / 882°E हा दीपिका पदुकोणचा पहिला टॅटू नाही, यापूर्वी तिने मानेच्या मागच्या बाजूला 'RK' टॅटू काढला होता. पण, नंतर तिने हा टॅटू फुलात बदलला.