शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कुरकुरीत कांदा भजी लगेच मऊ पडतात? पीठ कालवताना ‘इतकंच’ करा, भर पावसात भजी सादाळणार नाहीत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2025 18:56 IST

1 / 7
पावसाळा आणि कांदा भजीचे समीकरण काही वेगळेच. कुरकुरीत कांदा भजी कोणाला नाही आवडणार. अनेकदा भजी करताना ती कुरकुरीत होत नाही किंवा तेल अधिक प्रमाणात लागते. (how to keep onion bhaji crispy)
2 / 7
कांदा भजी जितकी जास्त कुरकुरीत असतील तितकीच त्याची चव चांगली. बऱ्याचदा कांदा भजी तळल्यानंतर अधिक मऊ पडतात. विकत आणलेली कांदा भजी कुरकुरीत लागतात पण घरी केलेली भजी मऊ होतात किंवा पाणी सुटते. पण या काही टिप्स लक्षात ठेवल्या तर कांदा भजी नुसत्या कुरकुरीत नाही तर एकदम परफेक्ट होतील.(onion bhaji not soggy trick)
3 / 7
कांदा भजी करण्यासाठी कांदे पातळ कापायला हवे. म्हणजे कांदे तेलात तळण्यासाठी फार वेळ लागणार नाही.
4 / 7
भजी तळताना तेल कडकडीत गरम नसावे. तेल मध्यम आचेवर गरम करा. ज्यामुळे भजी तळताना कच्ची राहणार नाही आणि चविष्ट कुरकुरीत होतील.
5 / 7
भजीचे पीठ तयार करताना बेसनाच्या पीठात २ ते ३ चमचे तांदळाचे पीठ घाला. ज्यामुळे भजी तळल्यानंतर मऊ पडणार नाही.
6 / 7
भजी तळताना तेल जास्त प्रमाणात शोषत असेल तर गरम तेलात मीठ टाकावे. त्यामुळे भजी जास्त तेलकट होणार नाही.
7 / 7
भजीचे बॅटर तयार करताना ते व्यवस्थित फेटून घ्या. भजी मस्त कुरकुरीत होतील.
टॅग्स :foodअन्नRecipeपाककृतीCooking Tipsकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.