1 / 7दिवाळीच्या सणात दिवे- पणत्या लावण्याचे विशेष महत्त्व आहे. या काळात घरोघरी दिवे- मेणबत्त्या लावल्या जातात. पण दिवाळी झाल्यानंतर वापरलेले दिवे, जळलेल्या मेणबत्ती किंवा फुले फेकून दिले जातात. 2 / 7दिवाळी झाल्यानंतर दरवर्षी आपण एकच चूक करतो. वापरलेल्या पणत्या, मेणबत्ती, फुले आपण फेकून देतो. पण याचा पुनर्वापर करुन आपण पर्यावरणाचे रक्षण करु शकतो. तसेच घर देखील स्वच्छ व सुंदर दिसेल.3 / 7वापरलेली किंवा सुकलेली फुले आपण एका काचेच्या भांड्यात २० ते ३० ग्रॅम गूळ आणि पाणी घालून झाकून ठेवा. महिनाभरानंतर हे खत म्हणून झाडांना घाला. यासाठी आपल्याला २० मिली एक लिटर पाण्यात मिसळा आणि झाडांवर फवारणी करा. 4 / 7पूजेत वापरलेल्या फुलांपासून आपण घरी धूप तयार करु शकतो. यासाठी आपल्याला सुकलेली फुले, सुक्या नारळाची साल, ४ ते ५ लवंगा, दालचिनी, तमालपत्र आणि कापूर मिक्सरमध्ये बारीक करुन पावडर बनवा. त्यात तेल आणि तूप घालून चांगले मिसळा. धूप तयार होईल. 5 / 7दिवाळीत वापरलेल्या पणत्या पुन्हा वापरण्यासाठी आपण त्यांना कुंड्यांखाली ठेवू शकतो. यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. आपण पणत्या तोडून मातीत मिसळू शकता. ज्यामुळे मातीची गुणवत्ता सुधारेल. 6 / 7उरलेल्या मेणबत्त्या वितळवून त्यात आवडता परफ्यूम घाला. काचेच्या भांड्यात ओता. त्यात धागा घाला आणि मेण थंड होण्यासाठी ठेवा. घट्ट झाल्यानंतर पुन्हा सुगंधित मेणबत्ती तयार आहे.7 / 7रिकाम्या पणत्या आपण छोट्या कुंड्यांमध्ये ठेवून बागेतील मातीवर ठेवू शकतो. लहान सोलर लाईट किंवा कँडल ठेवल्यास गार्डनला छान लूक मिळेल.