शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

सेलिब्रिटींनी घातलेली खास मंगळसूत्र पाहा; १० नाजूक, सुंदर मंगळसूत्र- गळ्यात दिसतील शोभून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:52 IST

1 / 10
सेलिब्रिटींनी परिधान केलेले मंगळसूत्र नेहमीच फॅशन आणि डिझाईन्सच्या जगात मोठे ट्रेंड्स सेट करतात. पारंपारीक मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये आता अधुनिक फ्यूजन आणि मिनिमलिझमचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो. (Celebrity Mangalsutra Design)
2 / 10
सध्या अनेक सेलिब्रिटीज जास्त लांब नसलेले आणि अगदी साधे मंगळसूत्र पसंत करत आहेत. जे रोजच्या वेस्टर्न किंवा पारंपारिक कपड्यांवर सहज मॅच करता येतात. (Celebrity Mangalsutra Patterns)
3 / 10
मराठमोळ्या मोठ्या मंगळसूत्रांमध्ये दोन वाट्यांचे मंगळसूत्र सध्या व्हायरल होत आहेत.
4 / 10
मंगळसूत्राच्या पेडंटमध्ये पारंपारीक सोन्याच्या वाटीऐवजी एक मोठा सोलिटेअर हिरा किंवा लहान हिऱ्यांची नाजूक डिजाईन हा लोकप्रिय ट्रेंड आहे.
5 / 10
यामी गौतम, प्रियांका चोप्रा आणि दीपिका पादुकोण यांच्यासारख्या अभिनेत्रींनी निवडलेल्या मंगळसूत्रांमध्ये गुंतागुंतीचे आणि युनिक पेंडंट दिसतात.
6 / 10
समंथाचे मंगळसूत्र रोजच्या वापराला आणि कधीतरी घालण्यासाठी एक सुंदर पॅटर्न आहे.
7 / 10
काही अभिनेत्रींना आपल्या मंगळसूत्राच्या लॉकेटमध्ये नवरा-बायकोच्या राशीची चिन्ह किंवा खास वैयक्तिक संदेश कोरून घेतले आहेत ज्यामुळे त्याला खास वैयक्तिक स्पर्श मिळाला आहे.
8 / 10
सेलिब्रिटींमध्ये विशेषत: मालिकांमधील व्यक्तीरेषांमध्ये जाड मण्यांचे आणि मोठ्या सोन्याच्या वाट्यांचे पारंपारीक मंगळसूत्र पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसत आहेत.
9 / 10
मंगळसूत्र वैवाहिक आयुष्य सुखी आणि समृद्ध होण्यासाठी परीधान केले जाते. मंगळसूत्राची लांब कमी करून त्याला ब्रेसलेट किंवा अंगठी म्हणून परीधान करण्याचा अनोखा ट्रेंडही सेलिब्रिटींनी सेट केला आहे.
10 / 10
मराठी मालिकांमधिल नायिकांनी परिधान केलेली तीन पदरी किंवा जाड मण्यांची पारंपारीक मंगळसूत्र आजही अनेक मराठी महिलांमध्ये लोकप्रिय आहेत.
टॅग्स :Shoppingखरेदीfashionफॅशन