1 / 10बॉलिवूड मधील मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी 'ग्रे डिव्होर्स' घेतला आहे. या कपलने १९ वर्षाच्या संसारानंतर २०१७ साली वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 'ग्रे डिव्होर्स' हा नेहमीच्या घटस्फोटासारखाच असतो, फरक फक्त इतकाच असतो की, बराच काळ एकत्र संसार करुन डिव्होर्स घेतला जातो. वेगवेगळ्या क्षेत्रांतील नामांकित जोडपी देखील आजकाल 'ग्रे डिव्होर्स' घेत आहेत. ही जोडपी कोणती आहेत ते पाहूयात.2 / 10आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या १५ वर्षानंतर म्हणजेच २०२१ साली 'ग्रे डिव्होर्स' घेतला. रीना दत्ता ही त्यांची पहिली पत्नी आहे. त्यानंतर त्यांनी किरण राव हिच्यासोबत दुसरं लग्न केलं होत. 3 / 10 फरहान अख्तर आणि अनुधा अख्तर यांनी १६ वर्ष आपलं लग्नाचं नातं टिकवलं. त्यानंतर २०१७ साली त्यांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेतला. 4 / 10अर्जुन रामपाल आणि मेहर जेसिया यांनी लग्नाच्या २१ वर्षानंतर डिव्होर्स घेतला. त्यांनी २०१९ साली डिव्होर्स घेतला. 5 / 10 सैफ अली खान आणि अमृता सिंह यांनी लग्नाच्या १३ वर्षानंतर २००४ मध्ये घटस्फोट घेतला. यानंतर सैफने करीना कपूरसोबत दुसरं लग्न केलं. 6 / 10हृतिक रोशन आणि सुजैन खान यांनी लग्नाच्या नंतर सुमारे १४ वर्ष नातं टिकवलं. २०१४ साली दोघांनी सामंजस्याने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 7 / 10भारताचा माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती अहवालत हे दोघे जवळपास २० वर्ष एकत्र संसार केल्यावर एकमेकांपासून विभक्त होत असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. 8 / 10एआर रहमान आणि त्यांची पत्नी सायरा बानो यांचा विवाह १९९५ मध्ये झाला होता. त्यानंतर या जोडप्याने लग्नाच्या २९ वर्षांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. या जोडप्याला खतिजा, रहीमा, आमेन अशी तीन मुले आहेत. 9 / 10मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांचा घटस्फोट सप्टेंबर २०२१ मध्ये झाला. या दोघांनीही एक संयुक्त पत्रक जारी करून घटस्फोटाची घोषणा केली होती. यांचा घटस्फोट लग्नानंतर २७ वर्षांनी झाला. या दोघांनीही परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला होता. 10 / 10उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर हे जोडपं फेब्रुवारी २०१६ साली लग्नबंधनात अडकले होते. दोघांमध्ये १० वर्षाचं अंतर आहे. उर्मिला तिच्या नवऱ्यापेक्षा १० वर्ष मोठी आहे. लग्नाच्या ८ वर्षांनंतर त्यांनी डिव्होर्स घेतला.