शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

निर्मला सीतारामन यांच्या 'बजेट शाली'ची चर्चा, काय त्या शालीच्या कापडाची खासियत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2026 13:20 IST

1 / 12
मागच्या काही वर्षांत अर्थसंकल्पाच्या दिवशी आणखी एका गोष्टीची उत्सुकता वाढली आहे ती म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची शाल किंवा साडी. ही केवळ कपड्यांची निवड नसून, भारताच्या परंपरेचा, हस्तकलेचा आणि सांस्कृतिक ओळखीचा शांत पण ठाम संदेश असतो. (Nirmala Sitharaman budget shawl)
2 / 12
निर्मला सीतारामन यांनी आतापर्यंत सादर केलेल्या सलग ९ अर्थसंकल्पांमध्ये दरवेळी वेगवेगळ्या प्रकारच्या पारंपरिक शाली किंवा साड्या परिधान केल्या. या शाली बहुतेक वेळा भारतातील विविध राज्यांतील हातमाग, हस्तकला आणि स्थानिक विणकाम परंपरेचं प्रतिनिधित्व करतात. कधी कांचीपुरमची रेशीम छटा, कधी खादीची साधेपणा दर्शवणारी शैली, तर कधी ईशान्य भारतातील सूक्ष्म नक्षीकाम प्रत्येक शाल मागे एक कथा असते. (budget shawl fabric)
3 / 12
या शालींची खासियत म्हणजे त्यांचा साधेपणा आणि अर्थपूर्ण निवड. त्या झगमगाटासाठी नसून, भारताच्या मातीशी जोडलेल्या असतात. हातमागावर विणलेल्या शाली म्हणजे हजारो कारागिरांच्या मेहनतीचं प्रतीक. अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या दिवशी अशा शाली परिधान करणं हे “लोकल ते ग्लोबल” या विचाराला अधोरेखित करतं. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय माध्यमांतही या शालींची नोंद घेतली जाते.
4 / 12
यंदाच्या बजेटमध्ये त्यांनी तामिळनाडूच्या कांजीवरम साडीवर घेतलेली वांगी रंगाची लोकरीची शाल. ही फक्त थंडीपासून आपले संरक्षण करत नाही तर दक्षिण भारतीय संस्कृती आणि जागतिक व्यापारातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतीक आहे.
5 / 12
२०२५ मध्ये बिहारच्या सुप्रसिद्ध मधुबनी पेंटिंगची साडी आणि त्यावर घेतलेली विशेष कलाकुसर असलेली शाल ही कारागिरांना दिलेली मानवंदना होती.
6 / 12
२०२४ - २५ मध्ये निवडणुकीपूर्वीच्या बजेटमध्ये त्यांनी गडद गुलाबी छटा असलेली शाल निवडली होती, जी ऊर्जेचे प्रतीक मानली जाते.
7 / 12
२०२४ मध्ये पश्चिम बंगालच्या 'कान्था' कामाची निळी साडी आणि त्याला साजेशी शाल घेऊन त्यांनी पूर्व भारताच्या कलेला सन्मान दिला.
8 / 12
२०२३ मध्ये कर्नाटकची 'कसुती' एम्ब्रॉयडरी असलेली साडी आणि त्यावर गडद शाल, हे नारी शक्तीचे उग्र पण संयमी रूप होते.
9 / 12
२०२२ मध्ये ओडिसाच्या हस्तकलेचा सन्मान करत त्यांनी मातीच्या रंगाशी मिळतीजुळती शाल निवडून 'जमिनीशी जोडलेले अर्थकारण' अधोरेखित केले.
10 / 12
२०२१ मध्ये तेलंगणाच्या इकत कलेचा गौरव करत त्यांनी या साडीवर 'कश्मीरी पश्मीना' शाल घेतली होती.
11 / 12
२०२० मध्ये समृद्धीचा रंग असलेल्या पिवळ्या साडीवर त्यांनी निळ्या रंगाची शाल परिधान करून भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडवले.
12 / 12
२०१९ पहिल्या बजेटमध्ये त्यांनी 'बही-खाता' आणून ब्रिटीशकालीन ब्रिफकेसची परंपरा मोडली. साध्या गुलाबी साडीवर त्यांनी घेतलेली पारंपारिक शाल साधेपणाचे प्रतीक होती.
टॅग्स :fashionफॅशनWomenमहिलाNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनBudgetअर्थसंकल्प २०२६