1 / 11१. २४ एप्रिल (24th April) हा दिवस फिनलँड येथे राष्ट्रीय श्वान दिवस (national dog day in Finland) म्हणून साजरा केला जातो. जगात सगळ्यात आनंदी लोक असणारा देश म्हणजे फिनलँड.. तिथे प्रत्येक घरात एक तरी कुत्रा असतोच असतो.. मुक्या जीवाला एवढं भरभरून, निस्वार्थ प्रेम करतात ही लोकं म्हणून तर एवढी आनंदी नाहीत ना?2 / 11२. एखाद्या मुक्या प्राण्यावर भरभरून प्रेम करणं ही फक्त एक कृती नाही. यामुळे तुमच्या शरीरात आणि मनावर अनेक सकारात्मक परिणाम घडून येतात. हॅप्पी हार्मोन्स शरीरात स्त्रवण्याचं प्रमाणदेखील यामुळे वाढतं. त्यामुळेच तर एकटेपणा आलेल्या, नैराश्यात गेलेल्या व्यक्तींना, मानसिक संतुलन ढासळलेल्या व्यक्तींना आजकाल पेट थेरपी देण्यात येते.3 / 11३. लॉकडाऊनच्या काळात तर आमच्या घरातले पेट हेच आमचा मोठा आधार झाले होते, असं कित्येक सेलिब्रिटींनी सांगितलं होतं. शाहरूख- सलमान- माधुरी- रविना- सोनाली यांच्यापासून ते आताच्या सिद्धार्थ- अनन्या पांडे पर्यंत अनेक सेलिब्रिटी पेट्सचे दिवाने आहेत. 4 / 11४. अनन्या पांडे आणि तिचा पेट डाॅगी यांचं प्रेम तर बहुचर्चित आहे. 5 / 11५. तिच कथा अनुष्काची. अनुष्काकडे लॅब्राडॉर जातीचा ब्रुनो नावाचा डॉगी तर आहेच, पण त्या व्यतिरिक्तही आणखी एक- दोन पेट डॉग्स तिच्याकडे आहेत. विराट आणि अनुष्का हे दोघेही पेट लव्हर आहेत. 6 / 11६. प्रियांका चोप्राच्या पेटचं नाव डायना.. ही डायना तिच्यासोबत अनेकदा विमानतळावर, तिच्या शुटींगच्या सेटवर दिसली आहे. निरागस डोळ्यांची डायना खरोखरंच सुंदर आहे.7 / 11७. अभिनेत्री श्रद्धाकडे असणारा शॅलोह हा काळ्या रंगाचा मोठ्ठा पेट डॉग पाहून खरंतर अनेकांना सुरुवातीला भीतीच वाटते. पण श्रद्धा मात्र त्याच्यासोबत भारीच धमाल- मस्ती करते.8 / 11८. करिश्मा कपूरचा पण तिच्या इवल्याशा केसाळ कुत्र्यावर भारीच जीव. 9 / 11९. अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं श्वान प्रेमही अगदी प्रसिद्ध.. कॅन्सरसाठी ती जेव्हा उपचार घेत होती, तेव्हादेखील थोडा वेळ ती तिच्या पेट डॉगसोबत घालवायचीच.10 / 11१०. माधुरी आणि तिच्या पेटचेही अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. शुटींग संपवून रात्री माधुरी घरी आल्याशिवाय तिच्याकडचे श्वाससाहेब जेवतही नाहीत म्हणे.. 11 / 11सोनम कपूरही नेहमीच कुत्र्यांच्या मांजरींच्या गराड्यात असते. तिच्याकडे कायम एक- दोन पेट असतातच.