शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

साडीच्या रंगानुसार निवडा लिपस्टिकच्या शेड्स, सणासुदीत- लग्न समारंभात दिसाल उठून, ओठही दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2025 18:05 IST

1 / 7
सण-समारंभ आले की, महिलांना नटण्या-मुरडण्याची आवड असते. लग्न समारंभात देखील महिलांना सगळ्यात उठून आणि आकर्षक दिसायचे असते. (Lipstick Color for Saree)
2 / 7
या काळात आपण अधिक सुंदर दिसावे यासाठी मेकअप करतो. परंतु, साडी किंवा ड्रेसवर कोणत्या प्रकारची लिपस्टिक लावायची हे समजत नाही. जर आपल्या देखील साडीच्या रंगानुसार लिपस्टिक शेड्स निवडता येत नसतील तर या गोष्टी लक्षात ठेवा. (Best Lipstick Shades for Saree)
3 / 7
लाल साडीसोबत लाल किंवा मरुन लिपस्टिक चांगले दिसते. हे आपल्याला क्लासिक कॉम्बिनेशन लूक देऊन पारंपारिक आणि ग्लॅमरस बनवते. यामध्ये आपण मॅट फिनिश असलेली लिपस्टिक वापरु शकतो. (Lipstick and Saree Color Combinations)
4 / 7
गुलाबी किंवा कोरल रंगाची लिपस्टिक ही गुलाबी साडीवर शोभून दिसेल. फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक आपल्या चेहऱ्यावर वेगळे तेज निर्माण करते. यामध्ये विविध शेड्स ही आपल्याला पाहायला मिळतात.
5 / 7
हिरव्या रंगाच्या साडीवर न्यूड किंवा पीच लिपस्टिक ट्राय करा. हे आपल्या ओठांना आकर्षक लूक देईल. पार्टी किंवा फॅमिली फंक्शनमध्ये आपण हा शेड्स वापरायला हवा.
6 / 7
पिवळ्या रंगाच्या साडीवर केशरी किंवा टोमॅटो लाल रंगाची लिपस्टिक निवडा. हे रंग आपला लूक अधिक सुंदर बनवतात.
7 / 7
निळ्या साडीसोबत डार्क प्लम किंवा वाईन लिपस्टिक वापरा. हा रंग आपल्या ओठांना सुंदर आणि आकर्षिक बनवतो. रात्रीच्या पार्टीत किंवा लग्नात आपण वापरु शकतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सWomenमहिला