घरी वापरण्यासाठी कॉटनचे सुंदर कॉड सेट्स; ८ कम्फर्टेबल पॅटर्न, एकदम स्टायलिश दिसाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:51 IST
1 / 8घरी वापरण्यासाठी साधे गाऊन्स किंवा टि शर्ट्स, पायजमा घालण्यापेक्षा तुम्ही हे सुंदर कॉड सेट्स घालू शकता. या कॉड सेट्समध्ये तुम्हाला कमी बजेटमध्ये एका पेक्षा एक व्हरायटीज मिळतील. (Cotton cod sets for women)2 / 8 हे सेट्स प्रामुख्यानं कॉटन, कॉटन ब्लेंड, रेयॉन आणि नाईटवेअरसाठी वापरले जाणारे मऊ फॅब्रिक्स यांसारख्या ब्रिथेबल आणि मऊ कपड्यांमध्ये उपलब्ध असतात. (8 Comfortable Trending cod sets for home use)3 / 8 टॉप आणि बॉटम एकाच पॅटर्न किंवा एकाच रंगाचे असल्यामुळे तुम्हाला वेगळे मॅछिंग करण्याची गरजच पडत नाही.4 / 8 तुम्ही हे सेट्स घरात आराम करताना, घरून काम करताना किंवा शेजारच्या दुकानात जाण्यासाठी देखील वापरू शकता. 5 / 8तुम्ही घरात वापरणार असाल तर कॉटन किंवा रेयॉनसारखे मऊ आणि हवा खेळती राहणारे फॅब्रिक निवडा.6 / 8 खूप घट्ट फिटिंग न निवडता आरामदायक आणि रिलॅक्स फिटिंग निवडा. 7 / 8 तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्लेन रंग, फ्लोरल प्रिंट किंवा जिओमेट्रिक डिझाईनचे सेट निवडू शकता.8 / 8यात तुम्हाला लाऊंजवेअर ओव्हरसाईज टि शर्ट, जॉगर्स, ए लाईन कुर्ता किंवा स्ट्रेट कट कुर्ता, पॅन्ट, प्लाझो असे पॅटर्न्स मिळतील.