शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उन्हाळ्यामध्ये टाळा 'या' रंगांचे कपडे, उकाडा कमी जाणवेल आणि त्वचेला त्रासही नाही होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 12:00 IST

1 / 10
उन्हाळा सुरू झाला की घामाने जीव हैराण होऊन जातो. सगळे कपडे ओले होतात. दिवसाच काय रात्रीही फार उकडते.
2 / 10
तुम्हाला माहिती आहे का? आपण कोणत्या रंगाचे कपडे घालतो, तसेच कोणत्या कापडाचे कपडे घालतो त्यानुसारही उकडा जाणवतो?
3 / 10
काही रंगाचे कपडे उन्हाळ्यामध्ये घालू नयेत. ते घातल्याने फारच जास्त उकडते. ते रंग उन जास्त शोषतात असे मानले जाते.
4 / 10
काळ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यामध्ये वापरू नयेत. काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये जास्त उकडते. हे वैज्ञानिकरित्याही सिद्ध झाले आहे.
5 / 10
गडद लाल तसेच गडद निळे असे कपडेही वापरू नका. एकंदरीत अति गडद रंग वापरणे टाळा.
6 / 10
आकाशी रंगाचे कपडे वापरणे फायदेशीर ठरते. रंग दिसायलाही फार सुंदर दिसतो.
7 / 10
पांढऱ्या रंगाचे कपडे उन्हाळ्यात वापरणे अगदीच गरजेचे आहे. उन्हाच्या झळा शरीराला कमी जाणवतात. पांढरा रंग उष्णता शरीरामध्ये शोषून घेत नाही.
8 / 10
कपड्याचे मटेरीयलही महत्त्वाचे असते. कोणत्याही कापडाचे कपडे उन्हाळ्यामध्ये वापरणे त्वचेसाठी हानिकारक ठरेल. घाम शरीरावर साठणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
9 / 10
कॉटनचे कपडे वापरणे सगळ्यात उत्तम ठरेल. तसेच कपडे घट्ट वापरू नका. छान सुटसुटीत कपडे वापरा.
10 / 10
जिन्स, नायलॉन अशी कापडे वापरणे टाळा. अशी कापडे शरीराला काचतात. तसेच हवाही खेळती राहत नाही.
टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलWomenमहिलाcolourरंग