शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

अंकिता लोखंडेचा शाही ड्रीम लूक, मेहंदी ते लग्न एकसेएक स्टाइल्स.. पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2021 17:47 IST

1 / 9
प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन या दोघांचे लग्न नुकतेच अतिशय थाटामाटात पार पडले. अंकिता सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असल्यामुळे ती नेहमीच चाहत्यांना तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत असते. त्याचप्रमाणे आताही तिने आपल्या आयुष्यातील या अतिशय महत्त्वाच्या प्रसंगाचे फोटो शेअर करत अपडेट दिले
2 / 9
इन्स्टाग्राम अकाऊंटवर अंकिताने तिच्या आणि विकीच्या लग्नाचे अतिशय देखणे फोटो अपलोड केले असून लेहंग्याच्या पारंपरिक लूकमध्ये अंकिता खूपच सुंदर दिसत आहे. तिचा गोल्डन रंगाचा अतिशय भरजरी लेहेंगा आणि त्यात उठून दिसणारे तिचे सौंदर्य पाहून चाहते पुन्हा एकदा घायाळ झाले आहेत.
3 / 9
विकी जैन प्रसिद्ध उद्योगपती असून तो गुजराती असला तरी लग्नाचे सर्व विधी महाराष्ट्रीयन पद्धतीने पार पडणार असल्याचे सांगण्यात आले होते. अंकिता लग्नमंडपात येत असताना लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक आणि मित्रमंडळींनी तिचे अतिशय जंगी स्वागत केल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तिच्या सैंदर्याची छबी आपल्या कॅमेरात कैद करण्यासाठी उपस्थितांपैकी अनेकांचे मोबाईल बाहेर आल्याचे दिसत आहे.
4 / 9
प्रेमात धीर, संयम असतो पण आमच्याकडे तो नाही अशा आशयाचे कॅप्शन अंकिताने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टला दिले आहे. त्याबरोबरच आता आपण ऑफिशिअली मिसेस जैन झाल्याचे सांगायलाही ती विसरली नाही. लग्नसोहळ्यानंतर उपस्थित असलेल्या ज्येष्ठांचे आशिर्वाद घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याप्रमाणे हे जोडपे बहुदा उपस्थितांचे आशिर्वाद घेत असावेत.
5 / 9
बॉयफ्रेंड विकीच्या प्रेमात असलेल्या अंकिताने वेगवेगळ्या पोजमध्ये काढलेले फोटो नेटीझन्सचे चांगलेच लक्ष वेधून घेत आहेत. तसेच तिचा अतिशय नॅचरल वाटेल असा उत्कृष्ट मेकअप आणि भारदार ज्वेलरी यामुळे तिच्या सैंदर्यात भर पडल्याचे पाहायला मिळते. विकीसाठी तिच्या आणि तिच्यासाठी विकीच्या डोळ्यात असलेले प्रेमाचे भाव आपल्याला या छायाचित्रांमधून दिसत आहेत.
6 / 9
गेल्या काही दिवसांपासून अंकिताचे स्पिन्स्टर्स पार्टी, मेहेंदी, हळद, एंगेजमेंट, संगीत अशा सर्व समारंभांचे एकाहून एक सुंदर फोटो पोस्ट करत आहे. यामध्ये लग्नाच्या विधींचेही काही फोटो दिसत आहेत. विकीही या फोटोंमध्ये अतिशय रुबाबदार दिसत आहे. विकी जैन हा विलासपूर येथील एका कोळसा उद्योगपतींचा मुलगा आहे.
7 / 9
अंकिता आणि सुशांत सिंग राजपूत यांची लव्ह स्टोरी चांगलीच गाजली होती. पवित्र रिश्ता या मालिकेनंतर हे दोघे अनेक वर्षे रिलेशनमध्ये होते. सुशांतचे निधन झाल्यानंतर अंकितालाही या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास झाला होता. मात्र त्यानंतर अंकिता विकी जैन याच्या प्रेमात पडली आणि तिने त्याच्याशी लग्नगाठ बांधली. अंकिता आणि सुशांत डिसेंबर महिन्यात लग्न करणार होते त्यामुळे अंकिताने डिसेंबरमध्येच लग्न केले का अशी चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे.
8 / 9
अंकिता छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री असून तिच्या अभिनयाने तिने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोइंग आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या कपलने आपल्या लग्नाची रिसेप्शन पार्टी रद्द केली आणि लग्नही अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत केले.
9 / 9
अंकिताच्या संगीतपासून ते लग्नापर्यंत सर्व विधींना बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यातील अनेकांनी अंकिता आणि विकी यांना महागडी गिफ्टस लग्नाची भेट म्हणून दिली. आता अंकिता यानंतर कोणते फोटो पोस्ट करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलfashionफॅशनmarriageलग्नAnkita lokhandeअंकिता लोखंडे