शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

श्लोका अंबानीच्या गळ्यात चमकणारा 'तो' अस्सल खानदानी दागिना नेमका कोणाचा? बघा त्याची किंमत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2024 15:51 IST

1 / 5
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. त्यानिमित्ताने अंबानी कुटूंबियांतर्फे शिवशक्ती पुजेचे आणि मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
2 / 5
या सोहळ्यात अंबानी कुटूंबाची मोठी सून श्लोका मेहता अंबानी हिने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले. या खास कार्यक्रमासाठी तिने मसाबा गुप्ता यांनी डिझाईन केलेली सोनेरी रंगाची अतिशय तलम अशी टिशू सिल्क साडी नेसली होती.
3 / 5
साडीचा संपूर्ण काठ अशा पद्धतीच्या पान पट्टी डिझाईनने सजला होता. विणण्यासाठी अतिशय नाजूक आणि कठीण असणाऱ्या पिता वर्क प्रकारात ती पानपट्टी डिझाईन तयार करण्यात आली होती.
4 / 5
या सुंदर साडीला मॅच करत तिने उजव्या खांद्यावरून एक भरजरी शेला घेतला होता. या शेल्यावरही अतिशय हेवी वर्क केलेले होते...
5 / 5
पण सगळ्यात जास्त उठून दिसत होता तो तिच्या गळ्यातला अस्सल खानदानी दागिना. श्लोकाने घातलेलं ते सोन्याचं गळ्यातलं तिच्या आजीकडून तिला मिळालं असून त्याची अंदाजे किंमत ६० लाख असावी, अशी चर्चा आहे. अतिशय नाजूक घुंगरू असणाऱ्या त्या नेकलेसचं डिझाईन खूपच वेगळं होतं. त्यामुळेच श्लोकाचा लूक अधिकच देखणा झाला होता..
टॅग्स :fashionफॅशनjewelleryदागिनेsaree drapingसाडी नेसणेMukesh Ambaniमुकेश अंबानीnita ambaniनीता अंबानी