1 / 8१. आलिया भट आणि रणवीर सिंग (Alia Bhatt and ranveer Singh) यांच्या प्रमुख भूमिका असणारा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटात आलियाने नेसलेल्या साड्यांची जेवढी चर्चा झाली तेवढीच चर्चा तिने घातलेल्या नोज पिनचीही होत आहे. आता या चित्रपटामुळे नोज रिंगची ट्रेण्डी फॅशन पुन्हा येणार असं दिसतंय..2 / 8२. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात आलियाने घातलेल्या बहुतांश सगळ्याच नोज पिन ऑक्सिडाईज प्रकारातल्या होत्या. त्यामुळे यंदा नवरात्री, दिवाळी किंवा लग्नसराईमध्ये ऑक्सिडाईज नोज पिन आणि त्यानिमित्ताने पुन्हा सगळेच ऑक्सिडाईज दागिने ट्रेण्डमध्ये येऊ शकतात.3 / 8३. साडी असो, पंजाबी ड्रेस असो किंवा मग कुर्ता आणि जीन्स असो.. ऑक्सिडाईज नोजपिन प्रत्येक गेटअपवर शोभून दिसते.4 / 8४. याआधीही आलियाच्या नोजपिनची चर्चा रंगली होती. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटातही तिने नोजपिन घातली होती.5 / 8५. या चित्रपटातले तिचे असे काही नोजपिन असलेले लूक तेव्हाही चर्चेत होते.6 / 8६. आलियाला स्वत:ला नोजपिन आवडते असं दिसतं. कारण तिच्या 'राजी' चित्रपटातही अनेक शॉट्समध्ये तिने नोजपिन घातलेली दिसून आली. ती नोजपिन मात्र सोनेरी रंगातली होती.7 / 8७. साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज, मोठी टिकली आणि त्यावर झोकदार नोजपिन असा लूक खरोखरच खूप आकर्षक आणि स्टायलिश दिसतो. एखाद्या कार्यक्रमात असा लूक करायला हरकत नाही. 8 / 8७. साडी, स्लिव्हलेस ब्लाऊज, मोठी टिकली आणि त्यावर झोकदार नोजपिन असा लूक खरोखरच खूप आकर्षक आणि स्टायलिश दिसतो. एखाद्या कार्यक्रमात असा लूक करायला हरकत नाही.