1 / 10केळी आपण नुसतीच खातो. ज्या प्रकारे इतर फळे खातो अगदी तसेच. मात्र केळीचा वापर करून छान पदार्थ ही तयार करता येतात. 2 / 10जे लोक फीटनेस फ्रिक असतात अशांसाठीही केळीचे हे पदार्थ फार फायदेशीर ठरतात. चवही छान आणि फॅट्सही कमी. 3 / 10पौष्टिक आहार घेणारे तसेच जीमला जाणारे लोक केळीचे पौष्टिक असे मिल्कशेक पितात. त्यामध्ये साखर घालू शकता. मात्र ते हेल्दी तयार करायचे असेल तर मध वापरा. चवीलाही छान लागते. 4 / 10एखादा दिवस भाजी न करता आपण शिकरण पोळी खातो. दुधामध्ये केळी कुसकरून घातल्यावर त्यावर मस्त तुपाची धार सोडायची. शिकरण-पोळी चवीलाही छान लागते.5 / 10केळीचे पॅनकेक फार मऊ आणि गोडसर असतात. छान पिकलेली केळी वापरा. मैद्याचा वापर करा. पिठीसाखरही वापरा. या मिश्रणातून उत्तम पॅनकेक तयार होतो. 6 / 10सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा कायम वेगळाच लागतो. त्यामध्ये केळी कुसकरून घातली जातात. शिऱ्याची चव केळ्यामुळे आणखी मस्त लागते.7 / 10केक हा प्रकार जरी प्रचंड अनहेल्दी असला तरी तो खजूर, केळ, दूध, मध असे पदार्थ वापरून हेल्दीही करता येतो. बनाना केक हा प्रकार अनेक देशांमध्ये प्रसिद्ध आहे.8 / 10उन्हाळ्यामध्ये खायलाच हवी केळीची स्मूदी. छान - थंडगार तसेच जीभेवरून सहज पोटात ढकलता येईल असा हा पदार्थ आहे. त्याचे टेक्श्चर अगदी सॉफ्ट असते. 9 / 10दही आणि केळी वापरून रायता तयार केला जातो. यामध्ये लाल तिखट घातले जाते. जसा पेरू रायता असतो तसाच हा केळी रायता.10 / 10कच्च्या केळ्याचे कापही छान होतात. चवीला अगदीच मस्त चमचमीत असतात. तयार करायलाही सोपे आहेत.