शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एलोवेरा जेल शुद्ध आहे की भेसळ, कसं ओळखाल? ५ सोप्या टिप्स, चेहरा - केसांना लावण्यापूर्वी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 19:22 IST

1 / 6
एलोवेरा जेल हे केसांपासून त्वचेपर्यंत सगळ्यांसाठीच ( 5 Ways To Tell If Your Aloe Vera Gel Is Pure & Not Fake) फायदेशीर ठरते. अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये या एलोवेरा जेलचा वापर फार मोठ्या (Knowing The Difference Bewteen Pure Aloe Vera Gel and Pure Gel ) प्रमाणात केला जातो. आपल्यापैकी बऱ्याचजणी शक्यतो बाजारांतून एलोवेरा जेल विकत आणतात. परंतु हे बाहेरून विकत आणलेले एलोवेरा जेल अस्सल आहे की बनावट ते नेमके कसे ओळखावे याच्या ५ टिप्स पाहूयात.
2 / 6
अस्सल एलोवेरा जेल हे हलक्या रंगाचे आणि पारदर्शक असते. जर एलोवेरा जेल खूपच घट्ट - दाटसर आणि गडद पांढऱ्या किंवा हिरव्या रंगाचे असेल तर ते बनावट आहे असे समजावे. अस्सल एलोवेरा जेल हे अधिक घट्ट दाटसर नसून थोडे पातळ असते, फारच चिकट असणारे एलोवेरा जेल बनावट किंवा भेसळयुक्त असते.
3 / 6
जेव्हा तुम्ही विकतचे एलोवेरा जेल घेता तेव्हा त्यावरील घटक पदार्थ तपासून पाहावेत. एलोवेरा जेल व्यतिरिक्त, त्यात अनेक केमिकल्स (जसे की पॅराबेन्स, कृत्रिम सुगंध, प्रिझर्व्हेटिव्ह्ज) असतील, तर ते शुद्ध एलोवेरा जेल नाही. अस्सल एलोवेरा जेलमध्ये ९०% पेक्षा जास्त एलोवेरा जेल असावे तरच हे अस्सल एलोवेरा जेल आहे असे समजावे.
4 / 6
खऱ्याखुऱ्या अस्सल एलोवेरा जेलचा सुगंध सौम्य आणि नैसर्गिक असतो. जर जेलला खूप तीव्र आणि आर्टिफिशियल सुगंध येत असेल तर ते बनावट असू शकते. बाजारात मिळणाऱ्या अनेक बनावट जेलमध्ये आर्टिफिशियल सुगंध असतो, जो खऱ्या एलोवेरा जेलपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो.
5 / 6
नेहमी चांगल्या दर्जाचे आणि विश्वासार्ह कंपनीचे एलोवेरा जेल खरेदी करा. लोकल ब्रँड किंवा अज्ञात कंपन्यांचे एलोवेरा जेल विकत घेणे टाळा कारण त्यात अशुद्धता असू शकते. तसेच, पॅकेजिंगवर '१००% शुद्ध एलोवेरा जेल' किंवा 'कोणतेही केमिकल्स नाहीत' असे लिहिले असले तरी, त्यातील घटक वाचून पहा.
6 / 6
जर तुम्ही एलोवेरा जेल खरेदी केले असेल तर ते वापरण्यापूर्वी त्वचेवर त्याची पॅच टेस्ट करा. जर तुम्हाला त्वचेवर एलोवेरा जेल लावल्यावर जळजळ, खाज किंवा चिकटपणा जास्त वाटत असेल तर याचा अर्थ असा की ते शुद्ध नाही. अस्सल एलोवेरा जेल त्वचेवर लावल्याने सौम्य थंडावा मिळतो आणि ते त्वचेत पटकन शोषले जाते.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHair Care Tipsकेसांची काळजीSocial Viralसोशल व्हायरल