शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कशाला पाहिजे विकतचे महागडे स्क्रब? घरातलेच ५ पदार्थ वापरा- टॅनिंग, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2024 12:38 PM

1 / 7
त्वचेवर टॅनिंग झालं असेल तर आपण स्क्रब करतो. स्क्रब केल्याने टॅनिंग तर निघून जातंच, पण त्वचेवरची डेड स्किन निघून गेल्याने त्वचा मऊ, नितळ दिसते.
2 / 7
तसेच ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स काढून टाकण्यासाठीही स्क्रब वापरल्या जातं. विकत मिळणारे महागडे स्क्रब वापरण्यापेक्षा घरचेच काही पदार्थ वापरून त्वचेसाठी उत्तम स्क्रब तयार करता येतं. हे पदार्थ नेमके कोणते आणि कसे वापरायचे, ते आता पाहूया.
3 / 7
पिठी साखर, कॉफी पावडर आणि मध एकत्र करून त्वचेला लावा. त्वचेवर छान चमक येईल. आरोग्यासाठी साखर फारशी चांगली नसली तर त्वचेसाठी मात्र ती खूप फायदेशीर आहे.
4 / 7
ओटमिल आणि मध एकत्र करून चेहऱ्याला मसाज करा. यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा फ्रेश होईल.
5 / 7
बेसन पीठ, चिमूटभर हळद, लिंबाचा रस आणि थोडंसं दही असं एकत्र करून चेहऱ्यावर लावा. यामुळे डेडस्किन निघून जाईल, त्वचा फ्रेश होईल. तसेच व्हाईट हेड्स आणि ब्लॅकहेड्स कमी होण्यासही मदत होईल. व्हाईट हेड्स आणि ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी स्क्रब करणार असाल तर आधी चेहऱ्याला थोडी वाफ द्या.
6 / 7
टोमॅटोची एक फोड घ्या. त्या फोडीवर साखर टाका आणि त्याने चेहऱ्याला स्क्रबिंग करा. चेहरा चमकदार होईल.
7 / 7
दही- कॉफी- बेसनपीठ हे ३ पदार्थ एकत्र करून चेहऱ्याला स्क्रब केलं तर चेहरा खुपच तजेलदार आणि फ्रेश होतो.
टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्सSkin Care Tipsत्वचेची काळजीHome remedyहोम रेमेडी