1 / 6तिशीनंतर कित्येकांच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग यायला सुरुवात झालेली दिसते. सुरुवातीला ते अगदीच बारीक असतात. तिळापेक्षाही लहान असतात. त्यामुळे आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो.(2 simple tricks to get rid of pigmentation)2 / 6पण नंतर मात्र ते वाढत जातात. गालावर, नाकावर, कपाळावर, हनुवटीवर वांगाचे डाग अगदी स्पष्ट दिसायला लागतात. त्याचा परिणाम साहजिकच तुमच्या सौंदर्यावरही होतोच.(how to remove pigmentation and dark spots?) 3 / 6त्यामुळेच जर चेहऱ्यावर वांगाचे डाग दिसायला असतील तर हा एक उपाय करून पाहा. हा उपाय काही ब्यूटी एक्सपर्टने सुचवलेला आहे. पण तो करण्याआधी पॅच टेस्ट मात्र नक्की घ्या.4 / 6हा उपाय करण्यासाठी मधामध्ये थोडी दालचिनी उगाळून घ्या आणि ते वांगाच्या डागावर ५ ते ७ मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर चेहरा धुवून टाका. एक दिवसाआड हा उपाय करू शकता. पण हा लेप लावल्यावर जर खूप जळजळ होत असेल तर मात्र हा उपाय करू नका.5 / 6दालचिनीमधले ॲण्टी बॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक तसेच ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेला नितळ, स्वच्छ करण्यासाठी मदत करतात.6 / 6मधामध्ये दालचिनीसोबतच जायफळ आणि हळकुंड उगाळा आणि या तिन्हींचा लेप वांगाच्या डागावर लावा. हा उपाय केल्यानेही वांगाचे डाग कमी होण्यास मदत होते. हा उपाय करण्यापुर्वी पॅच टेस्ट घ्या.