काठपदराच्या जुन्या साड्यांचे शिवा सुंदर वनपिस गाऊन, पाहा १० नवीन अनारकली ड्रेस डिझाइन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:30 IST
1 / 10प्रत्येकाच्याच कपाटात आईच्या किंवा आजीच्या जुन्या साड्या असतात. या साड्यांपासून तुम्ही नवनवीन स्टाईल्सचे गाऊन्स, ड्रेसेस शिवू शकता. साड्यांच्या गाऊन्सचे नवीन, स्टायलिश प्रकार पाहूया. (Make Anarkali Dresses From Old Silk Saree)2 / 10अनारकली स्टाईलमध्ये परसट गाऊन शिवून तुम्ही त्यावर फुल स्लिव्हज, बलून स्लिव्हज किंवा हाफ स्लिव्हजचं पॅटर्न शिवू शकता. (10 Ideas To Make Dresses From Old Sarees)3 / 10लग्नकार्यासाठी किंवा खास प्रसंगांसाठी लेस किंवा खड्यांचे वर्क असलेले गाऊन्स छान दिसतील.4 / 10जर साडीचा रंग कॉन्ट्रास्ट असेल तर तुम्ही या पॅटर्न्सचे ब्लाऊज शिवू शकता. मागचा भाग बंद न ठेवात हूक्स किंवा चेन लावून घ्या.5 / 10शर्टवर घालता येईल साडीचा स्कर्टसुद्धा शिवून घेऊ शकता. त्याच साडीचा वापर करून तुम्हाला दुपट्टा बनवून घेता येईल.6 / 10जर तुम्हाला सिंपल लूक हवा असेल तर फुल स्लिव्हज आणि स्वेअर नेकसह हे घेर असलेले पॅटर्न शिवू शकता.7 / 10मागे नॉट्स लावून तुम्ही जाळीदार गळा ठेवू शकता किंवा गोंडे लावू शकता.8 / 10साडीपासून ड्रेस शिवण्यासाठी तुम्हाला पॅटर्ननुसार शिलाई लागेल. सिंपल पॅटर्न असेल तर ५०० रूपयांपासून ते हेवी वर्क असेल तर २००० पर्यंत खर्च येईल.9 / 10कॉटनची साडी असेल तर तुम्ही त्याचे असे गाऊन्स शिवू शकता. हाताला पफ स्लिव्हजचे पॅटर्न्स छान दिसतील.10 / 10फ्रिलचे पॅटर्नसुद्धा उठून दिसतील. साड्याच्या रंगात किंवा कॉन्स्ट्रास्ट रंगात लेस लावू शकता.