शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

पुरुष महिलांच्या कोणत्या गोष्टींकडे सर्वात आधी पाहतात? पाचवी बाब धक्का देणारी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 18:26 IST

1 / 12
तुम्ही कधी विचार केलाय का, एखादा तरुण एखाद्या तरुणीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा तो तिच्यामध्ये काय पाहतो? प्रत्येकाच्या नजरेनुसार, अनुभवानुसार वेगवेगळी उत्तरे असू शकतात. पण याचा विचार महिला देखील करतात, की एखादा पुरुष आपल्यामध्ये पहिल्यांदा काय पाहत असेल...
2 / 12
रस्त्याने जात-येत असताना एखादा पुरुष टक लावून पाहून जात असेल, तर महिलांच्या मनात अनेक प्रश्न येतात. ड्रेस तर चांगला आहे ना, केस व्यवस्थित विंचरलेले आहेत ना, कुठे काही वेगळे वाटत नाहीय ना... एक ना अनेक प्रश्न...
3 / 12
जेव्हा एखादी स्त्री पुरुषाला पहिल्यांदा भेटते तेव्हा तिच्या कोणत्या गोष्टी त्याला आकर्षित करतात? यावर काही अभ्यास करण्यात आले आहेत. पुरुष महिलांमध्ये सर्वात आधी काय पाहतात, अशा ५ गोष्टी आहेत...
4 / 12
जेव्हा एखादा पुरुष एखाद्या महिलेला पहिल्यांदा पाहतो तेव्हा तो 5 गोष्टी सर्वात आधी पाहतो. शॅम्पू उत्पादक कंपनी पॅन्टीनने केलेल्या सर्वेनुसार पुरुष महिलांचे खुले आणि लहरत असलेले केस सर्वात आधी पाहतात. महिलांच्या केसांकडे 74 टक्के पुरुष आकर्षित होतात. 44 टक्के लोकांनी हे मान्य केले की ते प्रथम महिलांचे केस पाहतात.
5 / 12
बार काउंटरवर सुंदर केस असलेली मुलगी बसली असेल आणि लो-कट शर्ट घातलेली दुसरी मुलगी बसली असेल, तर मुले आधी सुंदर केस असलेल्या मुलीकडे आकर्षित होतात. यानंतर कपड्यांचा नंबर लागतो.
6 / 12
केसांनंतर मुले मुलींच्या कपड्यांकडे सर्वात जास्त पाहतात. मुलीने छान आणि स्वच्छ कपडे घातले असतील तर मुले जास्त आकर्षित होतात. 26 टक्के पुरुष महिलांचे कपडे पाहून त्यांच्याकडे आकर्षित होतात. मेकअप पाहून ४ टक्के पुरुष आकर्षित होतात. चमकदार रंगाचे कपडे यात मुख्य भूमिका बजावतात.
7 / 12
Match.com च्या सर्वेक्षणानुसार तरुणींच्या हसण्याकडे 88 टक्के तरुण आकर्षित होतात. पहिल्याच भेटीत तिच्या स्माईलने चांगली छाप पाडल्याचे या मुलांचे म्हणणे आहे. या सर्वेमध्ये १००० पुरुषांचा समावेश करण्यात आला होता.
8 / 12
मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, चांगली स्माईल देणाऱ्या मुलींनी लाल लिपस्टिक वापरल्यास ती 'आयसिंग ऑन द गोल्ड' बनते. भेटीच्या पहिल्या १० सेकंदांत पुरुषांची अर्धी नजर महिलांच्या चेहऱ्यावर खिळलेली असते.
9 / 12
जर मुलीने गुलाबी लिपस्टिक लावली असेल, तर ही वेळ सरासरी 6.7 सेकंदांपर्यंत जाते आणि जर तिने लाल लिपस्टिक लावली असेल तर ती 7.3 सेकंदांपर्यंत जाते. म्हणजेच लिपस्टिकचा रंग पुरुषांच्या नजरा खिळवण्यासाठी खूपच प्रभावी ठरतो.
10 / 12
पहिल्याच डेटवेळी मुलीच्या तोंडातून, श्वासातून दुर्गंधी येत असेल तर त्याकडे मुले लक्ष देतात. शरीरातून येणारा दुर्गंधही डेट बिघडवतो. मॅट डॉट कॉमनुसार तरुणीची नखे घाणेरडी किंवा विचित्रपणे कापलेली व नेलपॉलिश केलेली असतील तर गोष्ट बिघडते.
11 / 12
असे काही दिसल्यास तो मुलगा किंवा पुरुष दुसऱ्यांदा भेटण्यास टाळाटाळ करतो. चौथी गोष्ट हीच की मुले मुलींमध्ये ती करत असलेली वैयक्तिक स्वच्छता पाहतात.
12 / 12
महिलांच्या जवळून जाताना किंवा पहिल्या भेटीच्या वेळी पुरुष पाचवी गोष्ट पाहतात ती म्हणजे तिचे डोळे. 70 टक्के मुले मुलींच्या डोळ्यांकडे काळजीपूर्वक पाहतात. पहिल्या भेटीत मुलींच्या डोळ्यांचा मुलांवर खोलवर परिणाम होतो.
टॅग्स :WomenमहिलाBeauty Tipsब्यूटी टिप्स