शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपचा बदला घ्यायचा होता; पोरीने एक्स बॉयफ्रेंडकडून त्याची कार घेतली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 17:33 IST

1 / 11
ब्रेकअप केल्याचा बदला घेण्याची भावना बऱ्याच जणांमध्ये असते. कोणी त्याचे किंवा तिचे ठरलेले लग्न मोडते किंवा अश्लिल, खासगी क्षणांचे फोटो समाज माध्यमांवर टाकून बदनामी करते. जो तो त्याला सुचेल तो मार्ग पत्करतो. परंतू चीनमध्ये एका तरुणीने अजबच बदला घेतला आहे.
2 / 11
एकाच कारने जेव्हा दोन दिवसांत ५० वेळा वाहतुकीचे नियम मोडले, तेव्हा चीनमधील वाहतूक विभागही चक्रावून गेला होता. यामध्ये ४९ वेळा सिग्नल तोडला होता. तर एकदा वेगाने कार चालविली होती.
3 / 11
जेव्हा पोलिसांनी सीसीटीव्ही तपासत कार मालकाची चौकशी केली तेव्हा त्यांना चुकी कार मालकाने नाही तर त्याच्या एक्स गर्लफ्रेंडने केली होती.
4 / 11
त्याहून मोठा धक्का पोलिसांना त्या मागचे कारण जाणून बसला. खरेतर या चिनी पोरीने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकविण्यासाठी अजब रस्ता निवडला होता.
5 / 11
लू नावाच्या या तरुणीने एका मध्यस्थाकरवी तिच्या एक्स बॉयफ्रेंडची कियानची कार भाड्याने घेतली. आणि ही कार तिनेचीनच्या ज्हेंजियांग प्रांतात चालविली होती. ही ऑडी कार होती.
6 / 11
पोलिसांना ५० वेळा नियम तोडल्याची बाब खटकताच त्यांनी या कार मालकाकडे चौकशी केली. तेव्हा त्यांना ही कार भाड्याने दिल्याचे त्याने सांगितले. या गिऱ्हाईकाचा शोध घेतला असता ती लू नावाची तरुणी असल्याचे समजले. यानंतर या दोघांचे एकेकाळचे लफडेही पोलिसांना समजले आणि त्यांनी डोक्यावर हात मारून घेतला.
7 / 11
लू ही कियानच्या वागणुकीमुळे नाराज होती. तो नेहमी वेगवेगळ्या मुलींबरोबर त्याचे फोटो सोशल मीडियावर टाकत होता. तसेच लू ला टाळत होता. यामुळे लू ने त्याला धडा शिकविण्यासाठी बदला घेण्याचा प्लॅन आखला.
8 / 11
यासाठी लू ने लव्ह ट्रँगलचा आधार घेतला. तिला माहिती होते, की ज्हू नावाच्या तरुणाला ती आवडत होती. तिने त्याला कियानची गाडी रेंटवर घेण्यास यशस्वी झालास तर डेट करण्याचे आमिष दाखविले. बिचारा ज्ह्यू या तिच्या मोहपाशात फसला आणि लू ची गा़डी रेंटने घेण्याचे प्रयत्न करू लागला.
9 / 11
पोलिसांनी या घटनेनंतर व्हिडीओ फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना ती तरुणी एका तरुणासोबत कारमध्ये बसल्याचे दिसले. पोलिसांनी या दोघांचा शोध सुरु केला.
10 / 11
लू आणि तिच्या चाहत्याला पोलिसांनी अटक केली. सोशल मीडियावर देखील ही घटना खूप व्हायरल होत आहे. एका व्यक्तीच्या प्रतिक्रियेनुसार लूच्या प्रेमात पडून त्या तरुणाला केवळ बदनामी आणि तुरुंगवास मिळाला.
11 / 11
हा बदला घेण्याचा किस्सा चीनची सोशल मीडिया साईट वेईबोवर देखील खूप व्हायरल झाला. ही तरुणी खूप चॅप्टर होती आणि तो खूप साधा होता, अशा आशयाच्या प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता.
टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टTrafficवाहतूक कोंडीchinaचीन