By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2021 12:42 IST
1 / 8पुण्यातील आंबिल-ओढा परिसरात अतिक्रमणविरोधी कारवाई आज सकाळपासून सुरू झालीय. यात अनेक जेसीबींच्या माध्यमातून येऊन झोपडपट्टींवर कारवाई केली जात आहे. पण ऐन पावसाळ्यात होणाऱ्या कारवाईनं स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. 2 / 8कारवाईत नागरिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही नागरिकांनी यावेळी आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि स्थानिक नागरिकांमध्ये झटापटही झाली. 3 / 8पुण्याचा दांडेकर पुलालगत असलेल्या वस्तीतल्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक दिवस प्रलंबित आहे. या वस्ती मध्ये पुराचे पाणी शिरत असल्याने महापालिकेने हे प्रकरण गांभीर्याने घेत नागरिकांना इथून हटवायची तयारी केली. मात्र यावरून स्थानिक नागरिक प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.4 / 8आम्हाला कोणतीही सूचना न देता केवळ बिल्डर्स चा फायद्यासाठी ही कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.5 / 8महापालिकेच्या या कारवाईनंतर एक चिमुकला माध्यमांसमोर आपली व्यथा मांडत होता. सकाळपासूनच प्रशासन आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईनं चिमुकल्याला अश्रू अनावर झाले. 6 / 8कारवाई पूर्वी पुनर्वसन का करण्यात आलं नाही असा सवाल विचारत नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.7 / 8कोणतीही पूर्वकल्पना न देता कारवाई केली जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे अनेक संसार उघड्यावर आले असून अशा परिस्थितीत आम्ही कुठं जायचं असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे. अनेक घरातील लहान मुलांनाही अश्रू अनावर झाले आहेत.8 / 8आंबिल ओढा परिसरातील या १०० गुंठ्याच्या प्लॉटवर शहरातील अनेक बिल्डर्संची नजर असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.