By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 14:40 IST
1 / 7शरद पवारांचे नातू रोहित पवार हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दौरे करताना दिसत आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीनंतर आता, सिनेस्टार कलाकारांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत.2 / 7रोहित पवार यांनी नुकतेच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची कन्या सौंदर्या हिच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात मान्यवर आणि सेलिब्रिटींच्या भेटीगाठी घेत, जनसंपर्क अधिकच दांडगा केला आहे. 3 / 7सौंदर्या यांच्या लग्नात रोहित यांनी रजनीकांतचे जावई धनुष यांचीही भेट घेतली. त्यांसमवेत फोटो काढण्याचा मोह रोहित यांना आवरता आला नाही. 4 / 7या लग्नसोहळ्याला उपस्थित एआयएडीएमकेचे नेते एम.के. स्टॅलिन यांची भेट घेतली. त्यामुळे राज्यातून लवकरच केंद्रीय पातळीवरील नेत्यांच्या संपर्कात रोहित येत असल्याचं दिसतं.5 / 7रोहित हे शरद पवारांचे लाडके असून नुकतेच त्यांची इस्मा म्हणजेच इंडियन शुगर मिल असोशिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर रोहित यांच नाव राज्यात अधिकच चर्चिलं गेलं. 6 / 7रोहित पवार यांच्याकडे सध्या अनेक संस्थांमधील महत्त्वाची पदे आहेत. तर नुकतेच सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग जाणवत आहे, शेतकऱ्यांच्या बाधांवर जाऊन भेटी घेतल्यांतर आता सेलब्रिटींच्या लग्नालाही ते हजेरी लावत आहेत. 7 / 7शरद पवारांचे नातू असणारे रोहित पवार हे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने दौरे करताना दिसत आहेत. राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटीनंतर आता, सिनेस्टार कलाकारांच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहत आहेत.