Ana Maria Markovic: जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटूचा ग्लॅमरस लूक; 'रोनाल्डो'सोबत जायचं होतं डेटवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 19:51 IST
1 / 8जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटू ॲना मारिया मार्कोविकने तिच्या इस्टाग्राम अकाउंटवरून एक नवीन फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना ॲनाने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ॲना मारियाने फुटबॉलची जर्सी परिधान केलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, 'या दुसऱ्या फोटोत मी काय विचार करत होते?'2 / 8ॲना मारियाच्या या फोटोवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. या फोटोवर कमेंट करताना काही चाहते म्हणत आहेत की तू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विचार करत आहेस. तर, काहीजण म्हणाले की तू काय विचार करत आहात याची कोणाला पर्वा नाही. 3 / 8खरं तर क्रोएशियन फुटबॉलपटू ॲना मारियाच्या या पोस्टमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डोचे नाव येण्यामागे एक खास कारण आहे. कारण काही कालावधीपूर्वी तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, ती ख्रिस्तियानो रोनाल्डोची खूप मोठी फॅन आहे आणि त्याला डेट करण्यासाठी उत्सुक आहे.4 / 823 वर्षीय ॲना मारियाने मुलाखतीत सांगितले होते की, चेल्सी तिचा आवडता संघ आहे. फ्रँक लॅम्पार्ड अजूनही तिचा चेल्सीचा सर्वकालीन आवडता खेळाडू आहे. ॲना मार्कोविक सध्या स्विस महिला सुपर लीग क्लब ग्रासॉपर्सकडून खेळते. रिअल माद्रिदचा दिग्गज लुका मॉड्रिक हा ॲना मारियाचा आदर्श आहे, पण रोनाल्डो ही तिची पहिली पसंती आहे.5 / 8ॲना मारियाच्या नावावर क्रोएशियासाठी एक आंतरराष्ट्रीय गोल आहे. मात्र, काही काळापूर्वी ॲना मारियाने दावा केला होता की, ती क्रोएशियामधून इंग्लंडला जाण्याचा विचार करत आहे. ॲना मारियाच्या या दाव्याने फुटबॉल विश्वात खळबळ उडाली होती.6 / 8ॲना मारियानेही महिला खेळाडूंना येणाऱ्या अडचणींबाबत सोशल मीडियावर आवाज उठवला. ती म्हणाली होती की, जर पुरूष खेळाडूंनी शॉर्ट्समध्ये फोटो टाकले तर कोणाला हरकत नाही, पण जर मी बिकिनीमध्ये फोटो पोस्ट केला तर मला अश्लील कमेंटला सामोरे जावे लागते. 7 / 8अशा परिस्थितीत महिला खेळाडूंच्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन ॲना मारियाने पुरूष खेळाडूंना केले होते. ॲना मारिया मार्कोविक हिला जगातील सर्वात सुंदर फुटबॉलपटू मानले जाते.8 / 8ॲना मारिया अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या अधिकृत इस्टाग्रामवर अकाउंटवरून शेअर करत असते. चाहत्यांना मारियाचे फोटो खूप आवडतात आणि त्यावर जोरदार कमेंटही करतात.