कोण आहे भारताचा नवा 'बाहुबली'? ज्यानं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत केली लक्षवेधी कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 19:03 IST
1 / 8 जपानमधील टोकिया येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत भालाफेक क्रीडा प्रकारातील नवा हिरा चमकला. नीरज चोप्रासोबत फायनलमध्ये एन्ट्री मारणाऱ्या सचिन यादवनं लक्षवेधी कामगिरी करून दाखवलीये.2 / 8या स्पर्धेतील फायनलआधी अर्शद नदीम आणि नीरज चोप्रा यांची चर्चा झाली, पण या दोघांपेक्षा सचिन यादव भारी ठरला. ८६.२७ मीटर भाला फेकत तो चौथ्या क्रमांकावर राहिला. 3 / 8नीरज चोप्रा मागे पडल्यावर सचिन यादवनं भारताच्या पदकाची आस निर्माण केली होती. पण थोडक्यात त्याची पदक मिळवून स्पर्धा गाजवण्याची संधी हुकली. अमेरिकेच्या कर्टीस थॉम्पसन ८६.६७ मीटरसह त्याला मागे टाकत कांस्यवर कब्जा केला. याशिवाय या स्पर्धेत त्रिनबॅगोनियन केशोर्न वॉलकॉट ८८.१६ मीटर थ्रोसह सुवर्ण तर ग्रेनडाच्या अँडरसन पीटर्स याने ८७.३८ मीटर थ्रोसह रौप्य पदक पटकावले.4 / 8सचिन यादव याचा जन्म उत्तर प्रदेशमधील बागपतजवळील खेकरा या छोट्याशा गावातील शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. 5 / 8गतवर्षी इंडियन प्रिक्समध्ये ८२.६९ मीटर अंतर भालाफेकत त्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. त्या स्पर्धेत नीरज चोप्रासोबत खेळताना त्याने लक्षवेधी कामगिरी नोंदवली होतीी.6 / 8सचिन यादव हा उत्तर प्रदेश पोलिसात कार्यरत असून ऑल इंडिया पोलिस अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत ही त्याने ८४.२१ मीटर लांब भालाफेकत लक्षवेधी कामगिरी नोंदवली होती.7 / 8याच कामगिरीमुळे तो राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आला २०२५ मध्ये देहरादून येथील राष्ट्रीय स्पर्धेत त्याने ८४.३९ मीटर थ्रोसह आपल्या कामगिरीत सुधारणा करताना राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला होता. 8 / 8कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत ८५.१६ मीटर अंतर सर्वोत्तम थ्रोसह त्याने आपली ताकद दाखवून दिली. वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ स्पर्धेत त्याने कारकिर्दीतील सर्वोच्च कामगिरीसह चौथे स्थान पटकावले. त्याची ही कामगिरी 'गोल्डन बॉय'नंतर आता भारताला भालाफेक क्रीडा प्रकारात नवा 'बाहुबली' मिळाल्याचे संकेत देणारा आहे.