Tokyo Olympics, Carlo Paalam : ६ वर्षांचा असताना आईनं सोडलं, रस्त्यांवर कचरा उचलायचा अन् आज बनला ऑलिम्पिक मेडलिस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 15:54 IST
1 / 9Tokyo Olympics 2020 : चार वर्षांनी आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रत्येक खेळाडूनं अथक मेहनत घेतलेली असते... ऑलिम्पिकमध्ये काही जणं जेतेपद कायम राखण्यासाठी उतरतात, तर काही नवे विक्रम घडवण्यासाठी. 2 / 9एक ऑलिम्पिकपटू घडण्यामागे कुटुंबीय, मित्र परिवार, प्रशिक्षक अशा अनेकांचेही तितकेच योगदान असते. अशा अनेक प्रेरणादायी स्टोरी प्रत्येकी ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्याला ऐकायला मिळतात. अशाच एका ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूचा प्रवास थक्क करणारा आहे. 3 / 9फिलिपाईन्सच्या रस्त्यावर कचरा उचलणारा कार्लो पालम ( Carlo Paalam) आज टोकियोतून मायदेशात परतेल तो ऑलिम्पिक पदक विजेता म्हणून... बॉक्सिंगपटू कार्लोनं ४८-५२ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. 4 / 9भारताच्या अमित पांघलला याच खेळाडूनं पराभूत केले होते. रौप्यपदक जिंकणे हे कार्लोसाठी एक स्वप्नासारखेच आहे. एक काळ असा होता जेव्हा कार्लो रस्त्यावर असाच भटकायचा, कचरा उचलायचा, तेव्हा त्याला कदाचित ऑलिम्पिकबद्दलही माहीत नसावे. 5 / 9१६ जुलै १९९८मध्ये बुकिडोंन येथे त्याचा जन्म झाला. सवा वर्षांचा असताना त्याची आई कुटुंबीयांना सोडून निघून गेली. त्यानंतर त्याचे वडील नोकरीच्या शोधात कार्लोला घेऊन कागायन डी ओरोस शहरात गेले. 6 / 9तेव्हा कार्लो तेथे कचरा उचलायचा. शेजाऱ्यांनी त्याला बॉक्सिंग खेळण्याचा सल्ला दिला अन् ७व्या वर्षी त्यानं बॉक्सिंगमधील पहिला सामना जिंकला. बॉक्सिंग सामना जिंकल्यानंतर त्यानं मिळालेल्या पैशांतून तांदूळ खरेदी केले. याच एका गोष्टीनं त्याच्या आयुष्याला नवे वळण दिले. 7 / 9२००९मध्ये एका स्पर्धेदरम्यान काही स्थानिक संघटकांची त्याच्यावर नजर पडली आणि त्याला कागायन डी ओरोस बॉक्सिंग ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतले. २०१३मध्ये त्याची निवड फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय संघात झाली आणि तेथूच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. 8 / 9२००९मध्ये एका स्पर्धेदरम्यान काही स्थानिक संघटकांची त्याच्यावर नजर पडली आणि त्याला कागायन डी ओरोस बॉक्सिंग ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतले. २०१३मध्ये त्याची निवड फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय संघात झाली आणि तेथूच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली. 9 / 9२००९मध्ये एका स्पर्धेदरम्यान काही स्थानिक संघटकांची त्याच्यावर नजर पडली आणि त्याला कागायन डी ओरोस बॉक्सिंग ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सहभागी करून घेतले. २०१३मध्ये त्याची निवड फिलिपाईन्सच्या राष्ट्रीय संघात झाली आणि तेथूच त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुरू झाली.