शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Tokyo Olympic : रवी दहियाच्या दंडावर प्रतिस्पर्धी खेळाडूनं घेतला चावा; तरीही जखमी अवस्थेत सुवर्णपदकासाठी खेळणार!, photo viral

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2021 9:08 PM

1 / 11
Tokyo Olympic 2020, Ravi Kumar Dahiya : कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात भारताच्या रवी कुमार दहियानं अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास घडविला.
2 / 11
उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यानं झाकिस्तानच्या नुरीस्लॅम सानायेव्ह याची कडवी झुंज मोडून काढली. रवी कुमारनं जोरदार कमबॅक करताना अंतिम फेरीत प्रवेश केला. २०१२नंतर ऑलिम्पिकमधील भारताचे हे कुस्ती प्रकारातील पहिलेच पदक आहे.
3 / 11
रवी कुमारनं पहिल्या दोन मिनिटांत उत्तम बचावात्मक खेळ केला. पण, कझाकच्या खेळाडूनं पहिला गुण घेतला. त्यानंतर रवीनं मजबूत पकड करत दोन गुण घेत आघाडी घेतली. पहिल्या तीन मिनिटांच्या खेळात रवी कुमारनं २-१ अशी आघाडी घेतली होती.
4 / 11
दुसऱ्या सत्रातील पहिल्याच मिनिटात नुरीस्लॅमनं अँकर लेग ( मगर पकड) करत ८ गुण कमावले अन् ९-३ अशी भक्कम आघाडी घेतली. पुढच्या मिनिटाला रवी कुमारनं कझाकिस्तानच्या खेळाडूला रिंग बाहेर फेकून ३ गुण घेत पिछाडी ५-९ अशी कमी केली.
5 / 11
कझाकिस्तानचा खेळाडू जखमी झालेला पाहायला मिळाला, परंतु प्राथमिक उपचार घेत तो पुन्हा मॅटवर परतला. रवीनं जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी खेळाडूची पाठ मॅटवर टेकवून ४ गुण घेतले. अन Victory by fall नियमानुसार रवीला विजयी घोषित करण्यात आले.
6 / 11
रवी दहियानं प्रतिस्पर्धी खेळाडूला चीतपट केल्यानं त्याला ७-९ असे गुणफरक असूनही विजयी घोषित करण्यात आले. पण, चीतपट होत असताना कझाकिस्तानच्या खेळाडूकडून रडिचा डाव खेळला गेला अन् त्यानं रवीच्या दंडावर चावा घेतला.
7 / 11
त्यानं घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरावे लागणार आहे.
8 / 11
त्यानं घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरावे लागणार आहे.
9 / 11
त्यानं घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरावे लागणार आहे.
10 / 11
त्यानं घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरावे लागणार आहे.
11 / 11
त्यानं घेतलेल्या चाव्याचे व्रण रवीच्या दंडावर स्पष्ट दिसत आहेत आणि या जखमेसह भारतीय कुस्तीपटूला गुरुवारी फायनलमध्ये उतरावे लागणार आहे.
टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Wrestlingकुस्ती