शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Ballon Dor 2025 : 'नवा गडी नव राज्य' अन् तिने मेस्सीच्या एलीट क्लबमध्ये एन्ट्री मारल्याची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 20:32 IST

1 / 8
फुटबॉल जगतातील प्रतिष्ठित बॅलन डी'ओर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली. ६९ व्या बॅलन डी'ओर पुरस्कार सोहळ्यात पुरुष गटात 'नवा गडी नव राज्य' असं काहीसं चित्र पाहायला मिळालं.
2 / 8
पॅरिस सेंट-जर्मेन (PSG) क्लबकडून खेळणारा फ्रान्सचा स्टार विंगर उस्माने डेम्बेले (Ousmane Dembele) याने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच हा पुरस्कार पटकवला आहे.
3 / 8
दुसऱ्या बाजूला महिला गटात बार्सिलोनाची मिडफील्डर एताना बोनमती हिने फुटबॉलच्या मैदानातील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिसऱ्यांदा हा पुरस्कार मिळवत इतिहास रचला आहे.
4 / 8
पॅरिसमध्ये पार पडलेल्या खास सोहळ्यात उस्माने डम्बेले याने आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण अनुभवला. फ्रान्सच्या २८ वर्षीय फुटबॉलपटून बार्सिलोनाच्या लामिन यमाल आणि क्लबमधील सवंगडी विटिन्हाला मागे टाकत पहिल्यांदा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकला.
5 / 8
२६ वर्षीय स्पॅनिस महिला फुटबॉलपटूनं सलग तिसऱ्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. २०२३ मध्ये स्पेनला वर्ल्ड चॅम्पियन केल्यावर तिने पहिल्यांदा हा पुरस्कार जिंकला होता. तिचा हा सिलसिला यंदाही कायम राहिला.
6 / 8
फ्रान्स अन् PSG फुटबॉलर स्टार उस्माने डेम्बेले याने ५३ सामन्यात ३५ गोलसह १४ गोल असिस्ट करत यंदाचं वर्ष गाजवलं आहे. त्याचं मोठ बक्षीस त्याला मानाच्या पुरस्कारासह मिळाले.
7 / 8
एताना बोनमती ही सलग तीन वेळा हा पुरस्कार जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. या कामगिरीसह ती मेस्सी आणि मिशेल प्लाटिनी यांच्यासह एलीट क्लबमध्ये सहभागी झालीये.
8 / 8
८ वेळा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकणाऱ्या अर्जेंटिनाच्या मेस्सीनं २००९ ते २०१२ सलग चार वर्षे हा पुरस्कार जिंकल्याचा रेकॉर्ड आहे. फान्सचा दिग्गज फुटबॉलपटू मिशेल प्लाटिनी (Michel Platini) याने १९८३, १९८४ आणि १९८५ मध्ये सलग तीन वेळा हा पुरस्कार जिंकला होता. या दिग्गजांच्या यादीत आता एताना बोनमतीचा समावेश झालाय.
टॅग्स :Footballफुटबॉल