By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 18:20 IST
1 / 4दिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला. 2 / 42014 मध्ये दिव्याने 10 वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.3 / 4दिव्या ही स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या जितेंद्र व नम्रता देशमुख या दांपत्याची मुलगी असून चेन्नईतील आर. बी. रमेश यांच्या चेस गुरूकुल अकादमीची विद्यार्थिनी आहे. 4 / 4गेली दोन ते तीन वर्षे दिव्या चेस गुरुकूलमध्ये प्रशिक्षण घेत आहे. दिव्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असून ती कुठल्याही दडपणाविना बुद्धीबळ खेळते असे मतही रमेश यांनी व्यक्त केले.