By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 15:12 IST
1 / 62018ची टूर दी फ्रान्स जीरेंट थॉमसने जिंकली आणि पुन्हा एकदा जगातील क्रीडा नकाशावर वेल्सचे नाव चर्चेला आले. 32 वर्षीय थॉमसने प्रथमच ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. थॉमसच्या या विक्रमी कामगिरीमुळे वेल्सच्या किमयागार खेळाडूंवर टाकलेला दृष्टीक्षेप...2 / 6रेयाल माद्रिदचा प्रमुख खेळाडू गॅरेथ बेल हाही वेल्सचाच. त्याने आपल्या कौशल्यपूर्ण खेळाच्या जोरावर फुटबॉल विश्वात आपला दबदबा निर्माण केला. 3 / 6युएस मास्टर्स गोल्फ स्पर्धा जिंकणारा पहिला व एकमेव खेळाडू म्हणून इयान वेसनॅम यांची ओळख आहे. हे जेतेपद पटकावताना त्यांनी सेव्हे बॅलेस्टीरोस, निक फॅल्डो, टॉम वॉटसन, बेर्नहार्ड लँगर आणि जॅक निक्लॉस या दिग्गजांना नमवून हे जेतेपद पटकावले. 4 / 6निकोल कूकने 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत सायकल शर्यतीतील सुवर्णपदक नावावर केले आणि त्याच वर्षी तिने विश्वविक्रमही नोंदवला. 29व्या वर्षी तिने निवृत्ती घेतली.5 / 6बॉक्सिंगपटू जो कॅल्झाघे याने 2008 मध्ये न्यू यॉर्कच्या मॅडीसन स्क्वेअर गार्डनवर रॉय जोन्स ज्युनियरवर मात केली. त्याने कारकिर्दीत 46 पैकी 46 सामने जिंकले आणि त्यात वर्ल्ड सुपर-मिडलवेट गटाच्या 21 जेतेपदांचा समावेश आहे. 6 / 621 टप्प्यांच्या टूर दी फ्रान्स सायकल शर्यतीत थॉमसने दोन मिनिटांच्या फरकाने जेतेपद पटकावले. थॉमस स्काय टीमचे नेतृत्व करत होता आणि मागील सात हंगामातील त्यांचे हे एकूण सहावे जेतेपद आहे.