नवी मुंबईत दहीहंडीचा उत्साह, साई तेजस प्रतिष्ठाननंही रचले थरावर थर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 23:21 IST
1 / 6नवी मुंबईतही दहीहंडीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय. नवी मुंबईसह ठाण्यात दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. मोठ्या उत्साहात गोविंदा पथकांनी थरावर थर रचले.(सर्व छायाचित्र- भालचंद्र जुमलेदार) 2 / 6 राज्यातील पूर परिस्थितीमुळे राजकीय नेत्यांनी मोठ्या दहीहंड्या रद्द केल्या. तरी गोविंदा पथकांचा उत्साह मात्र कायम असल्याचं पाहायला मिळालं. 3 / 6नवी मुंबईतल्या साई तेजस प्रतिष्ठाननंही दहीहंडीसाठी एकावर एक थर लावले होते. 4 / 6 शेकडो गोविंदांनी गोविंदा रे गोपाळा, तुझ्या घरात नाही पाणी घागर उताणी रे गोपाळा यांसारख्या गाण्यांवर चांगलाच ताल धरला होता. 5 / 6अनेक ठिकाणच्या दहीहंड्या रद्द करून दहीहंडीची रक्कम मंडळांनी पूरग्रस्तांना दिली आहे. 6 / 6एकंदरीतच दहीहंडीचा उत्साह दरवर्षीप्रमाणे पाहायला मिळालेला नाही.