शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : सचिन तेंडुलकरच्या जन्मदिनानिमित्त विशेष कलाकृती, लॉकडाऊनचा दिला संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 22:22 IST

1 / 4
नवी मुंबई : क्रिकेटपट्टू सचिन तेंडुलकर यांच्या जन्मदिनानिमित्त कोपर खैरणेतील कलाकाराने पुश पिनांचा वापर करून कलाकृती तयार केली आहे. त्यावर नागरिकांनी घरीच राहण्याचा संदेश देखील दिला आहे. 2 बाय 3 फुटाच्या या कलाकृतीची ५४०० पुश पिनांचा वापर करण्यात आला आहे.
2 / 4
कोपर खैरणे येथे राहणाऱ्या आबासाहेब शेवाळे यांनी पाच रंगाच्या पुश पिना वापरून ही कलाकृती तयार केली आहे. क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांना जन्मदिनाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यासाठी हा प्रयत्न केला आहे.
3 / 4
यासाठी त्यांना दोन दिवसाचा कालावधी लागला आहे. सध्या जगावर कोरोनाच्या संकटाचे सावट आहे. त्यापासून वाचण्यासाठी प्रत्येकाने घरी राहणे हाच उपाय आहे. यामुळे शेवाळे यांनी याकलाकृतीच्या माध्यमातून सचिन तेंडुलकर यांना शुभेच्छा देत नागरिकांना घरी राहण्याचा संदेश दिला आहे. तर कलाकृतीसाठी लाल, निळा, पांढरा, काळा रंगाच्या पुश पिन वापरल्या आहेत.
4 / 4
शेवाळे यांच्या नावे अशाच कलाकृतीच्या चार रेकॉर्डची नोंद आहे. त्यामध्ये पणत्या पासून विराट कोहलीचे चित्र, चेस पासून धोनीचे चित्र अशा कलाकृतींचा समावेश आहे. त्यांनी आजपर्यंत पुश पिनांचा वापर करून १०० हुन अधिक कलाकृती तयार केल्या आहेत.
टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडुलकरNavi Mumbaiनवी मुंबई