पंतप्रधानांच्या कार्यक्रमात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना निमंत्रण नसल्याने शिवसैनिकांचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 22:41 IST
1 / 4पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवी मुंबई दौऱ्यातील कार्यक्रमांचे निमंत्रण शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना नसल्याने संतप्त शिवसैनिकांनी नवी मुंबईत जोरदार विरोध प्रदर्शन केले. ( सर्व छायाचित्रे - भालचंद्र जुमलेदार) 2 / 4शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला. 3 / 4या आंदोलनामध्ये शिवसेनेचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 4 / 4या आंदोलकांना थोपविताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली.