"तुम्ही जनतेच्या पैशातून हेलिकॉप्टरमधून फिरता, आमची किंमत नाही"; केंद्रीय मंत्र्यांवर मृताची पत्नी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 21:00 IST
1 / 7मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गुजरातमधील तिघांचा मृत्यू झाला. त्यात सुरतचे शैलेशभाई कलथिया होते. गुरुवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या गर्दीत, केंद्रीय जलशक्ती मंत्री सीआर पाटील त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी पोहोचले. यावेळी शैलेशभाई यांची पत्नी शीतलबेन यांच्या रोषाला केंद्रीय मंत्र्यांना सामोरे जावे लागले.2 / 7शितलबेन यांनी या दहशतवादी हल्ल्यासाठी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना जबाबदार धरले. 'पहलगाममध्ये सैन्य नव्हते, पोलिस नव्हते. मी मदतीसाठी ओरडत राहिले. इतके मोठे पर्यटन स्थळ असूनही, तेथे वैद्यकीय सुविधा नव्हती. तुम्ही लोक जनतेच्या करांचा वापर करून हेलिकॉप्टरमधून प्रवास करता. तुमचे जीवन हे जीवन आहे, करदात्यांचे जीवन हे जीवन नाही का? असा सवाल त्यांनी केंद्रीय मंत्र्यांना विचारला.3 / 7शीतलबेन बोलत असताना, केंद्रीय मंत्री मान खाली घालून शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत राहिले. 'हो ताई, नक्कीच, आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ,' असे सीआर पाटील म्हणाले. 4 / 7यावर शितलबेन यांनी, 'अजिबात नाही. आम्हाला आता सरकारवर विश्वास राहिलेला नाही. आधी आम्हाला आत्मविश्वास होता, म्हणूनच आम्ही पहलगामला गेलो होतो. पहलगाममध्ये कोणत्याही सुविधा नाहीत, सैन्य नाही, पोलिस नाहीत. जेव्हा एखादा मोठा नेता किंवा व्हीआयपी येतो तेव्हा त्यांच्या मागे किती वाहने येतात? नेते ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात ते फक्त करदात्यांनी दिलेल्या पैशावर चालतात,' असं म्हटलं.5 / 7दहशतवादी आमच्याजवळ येतात आणि हिंदू आणि मुस्लिमांबद्दल विचारतात आणि नंतर फक्त हिंदूंनाच गोळ्या घालतात. त्यावेळी सैन्य काय करत होते? ते खूप मोठे पर्यटन स्थळ आहे. तरीही तिथे लष्कराचे जवान, पोलिस किंवा कोणतीही वैद्यकीय सुविधा नाही.6 / 7जर मोदी सरकारला सर्व सुविधा फक्त स्वतःसाठीच ठेवायच्या असतील तर आजपासून कोणीही या सरकारला मतदान करणार नाही. तुमच्या मागे किती व्हीआयपी येतात, तुमच्याकडे किती वाहने आहेत? तुमचे जीवन हे जीवन आहे, करदात्याचे जीवन हे जीवन नाही का? जर तुम्ही इतका कर घेत असाल तर सुविधा का देत नाही? असाही सवाल शितलबेन यांनी केली.7 / 7जर मोदी सरकारला सर्व सुविधा फक्त स्वतःसाठीच ठेवायच्या असतील तर आजपासून कोणीही या सरकारला मतदान करणार नाही. तुमच्या मागे किती व्हीआयपी येतात, तुमच्याकडे किती वाहने आहेत? तुमचे जीवन हे जीवन आहे, करदात्याचे जीवन हे जीवन नाही का? जर तुम्ही इतका कर घेत असाल तर सुविधा का देत नाही? असाही सवाल शितलबेन यांनी केली.