शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

वायनायडच्या संकटात ७० जवानांचे नेतृत्व करतेय महाराष्ट्राची लेक; दीड दिवसात बांधला १९० फूट लांब पूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2024 16:28 IST

1 / 7
मेजर सीता शेळके यांच्या निस्वार्थ सेवा आणि समर्पणाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन होत आहे. मेजर सीता शेळके यांनी बेली ब्रिजच्या बांधकामावर देखरेख केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे चुरलमाला येथील तुफान वाहणाऱ्या नदीवर १९० फूट लांबीचा बेली पूल अवघ्या १६ तासांत पूर्ण झाला.
2 / 7
बेली ब्रिज बांधण्यासाठी मेजर सीता शेळके आणि त्यांच्या टीमने १६ तास न थांबता काम केले. जेणेकरून, बचाव पथक न थांबता मुंडकाई गावात पोहोचू शकेल. मेजर सीता शेळके यांनी खचून न जाता १६ तासांत हे काम पूर्ण केले.
3 / 7
सीता शेळके या २०१२ मध्ये भारतीय सैन्यात सामील झाल्या आणि सध्या बंगळुरू स्थित भारतीय सैन्यात मद्रास अभियांत्रिकी ग्रुप मेजर म्हणून तैनात आहे.
4 / 7
मेजर सीता शेळके या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील असून चेन्नई ओटीए येथून त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या मद्रास अभियांत्रिकी गटाच्या (MEG) ७० सदस्यांच्या संघात मेजर सीता शेळके या एकमेव महिला अधिकारी आहेत.
5 / 7
मेजर सीता शेळके यांचा पुलावर उभा असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या चर्चेत आल्या होत्या. त्या फोटोसोबत 'मेजर सीता शेळके आणि इंजिनिअर रेजिमेंटला तुमचा अभिमान आहे. वायनाडमध्ये बेली ब्रिजचे 16 तासांपेक्षा कमी कालावधीत यशस्वीपणे बांधकाम करणे हे अविश्वसनीय आहे!', असे कॅप्शन देण्यात आलं होतं.
6 / 7
भारतीय लष्कराचा मद्रास अभियांत्रिकी गट 'मद्रास सॅपर्स' या नावाने प्रसिद्ध आहे. ही टीम नैसर्गिक आपत्तींच्या वेळी बचाव कार्यात मदत करते.
7 / 7
बेली ब्रिजचे बांधकाम ३१ जुलै रोजी रात्री ९:३० वाजता सुरू झाले आणि १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत पूर्ण झाले होते. या पुलाची क्षमता तपासण्यासाठी लष्कराने आधी आपले वाहने नदीच्या पलीकडे नेले होते.
टॅग्स :KeralaकेरळfloodपूरIndian Armyभारतीय जवानAhmednagarअहमदनगर