निष्ठावान कुत्र्यांची अनोखी कहानी, मालकाचे प्राण वाचवण्यासाठी दिला स्वतःचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 16:36 IST
1 / 10 नवी दिल्ली: तुम्ही सर्वांनी अनेकदा कुत्र्यांच्या निष्ठेचे अनेक किस्से ऐकले असतील. पण, तुम्ही कधीच अशी कहानी ऐकली नसेल, ज्यात एक नव्हे तर दोन कुत्र्यांनी आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव पणाला लावला. असेच एक प्रकरण उत्तर प्रदेशमधील भदोही येथे घडले आहे.2 / 10 या घटनेवरुन 1985 मध्ये प्रदर्शित झालेला जॅकी श्रॉफचा सुपरहिट चित्रपट 'तेरी मेहराबानियाँ'ची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.3 / 10 येथील दोन कुत्र्यांनी आपल्या मालकाचा जीव वाचवण्यासाठी थेट विषारी सापाशी सामना केला. यात त्या दोन्ही कुत्र्यांचा विषबाधेने मृत्यू झाला, पण त्यांनी स्वतःच्या मृत्यूपूर्वी मालकाचा जीव मात्र वाचवला.4 / 10भदोहीच्या जयरामपूरमधील एका घरात जर्मन शेफर्ड जातीचे शेरू आणि कोको अशी दोन कुत्री राहत होती. या दोघांनी नेहमी आपल्या घराचे रक्षण केले.5 / 10अनोळखी व्यक्तींना हे आपल्या घराच्या आसपासही फिरू देत नव्हते. रविवार(दि.8) रात्री नेहमीप्रमाणे चौकीदारासह दोन्ही कुत्रे आपल्या घराच्या सुरक्षेत तैनात होते.6 / 10 यावेळी अचानक घरात एका विषारी साप आला. या सापाला पाहताच त्या दोन्ही कुत्र्यांनी भुंकणे सुरू केले.7 / 10 काही वेळानंतर दोन्ही कुत्र्यांची सापासोबत लढाई सुरू झाली. बराचवेळ त्या तिघांची लढाई चालली आणि अखेर कुत्र्यांनी त्या सापाचे दोन तुकडे केले. 8 / 10काही वेळानंतर कुत्र्यांचीही तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर सापाने दोन्ही कुत्र्यांना चावल्याचे समजले. तब्येत जास्त बिघडल्यामुळे अखेर शेरू आणि कोकोचा मृत्यू झाला. 9 / 10 या घटनेवेळी घराचा मालक कुठेतरी बाहेर गेला होता. घरी परतल्यावर मालकाला आपल्या कुत्र्यांच्या पराक्रमाची माहिती मिळाली. हे ऐकून मालकाला अश्रू अनावर झाले.10 / 10 साप घरात शिरला असता तर काहीतरी मोठी दुर्घटना घडली असती. शेरू आणि कोकोने आमच्यासाठी स्वतःचा जीव दिला, अशी प्रतिक्रिया कुत्र्यांच्या मालकाने व्यक्त केली. तसेच, मृत्यूनंतर सन्मानाने त्या दोघांना अंतिम निरोप देण्यात आला.