अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:23 IST
1 / 9केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान शनिवारी जुगागड येथे आले होते. त्यावेळी एक अजब किस्सा घडला आहे. पत्नी साधना सिंह यांना मागे सोडत केंद्रीय मंत्री २२ वाहनांच्या ताफ्यासह जुनागड ते राजकोटच्या दिशेने रवाना झाले होते. 2 / 9१ किलोमीटर अंतरावर पोहचताच केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना पत्नीला सोबत घेतले नाही हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तातडीने ताफा पुन्हा मागे वळवला. मंत्र्यांचा ताफा मूंगफली शोध केंद्र येथे परतला, जिथे साधना सिंह प्रतिक्षालयात बसल्या होत्या. 3 / 9शिवराज सिंह चौहान हे पत्नीसह गुजरातला धार्मिक आणि सरकारी दौऱ्यावर आले होते. सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि गिर इथं सिंह दर्शनानंतर ते शनिवारी मूंगफली शोध केंद्रात शेतकरी आणि लखपती दिदी योजनेशी निगडित महिलांच्या संवाद कार्यक्रमाला पोहचले होते. 4 / 9मूंगफली शोध केंद्र येथील कार्यक्रम आटोपून त्यांना रात्री ८ वाजता राजकोटहून फ्लाईट पकडायची होती. जुनागड ते राजकोट रस्त्याची अवस्था खराब असल्या कारणाने शिवराज सिंह चौहान गडबडीत होते. कार्यक्रम स्थळी ते वारंवार घड्याळाच्या काट्याकडे पाहत असल्याचे दिसून येत होते. 5 / 9जेव्हा शिवराज सिंह चौहान यांना कार्यक्रमात भाषण करायला सांगितले की, तेव्हा त्यांनी राजकोटचा रस्ता खराब आहे. पुढच्या वेळी मी येईन तेव्हा मोकळा वेळ काढून येईन असं सांगत त्यांनी थोडक्यात भाषण उरकले आणि तिथून घाईघाईत खाली उतरले. त्यानंतर ताफ्याकडे जात ते वेगाने तिथून निघून गेले. 6 / 9दुसरीकडे केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची पत्नी साधना सिंह गिरनार दर्शन करून परतल्यानंतर कार्यक्रमस्थळी प्रतिक्षालयात बसल्या होत्या. शिवराज सिंह चौहान यांचा ताफा निघून गेल्यानंतर काही वेळाने मंत्र्यांना पत्नीसोबत नसल्याचे लक्षात आले.7 / 9शिवराज सिंह चौहान यांनी तात्काळ ताफा पुन्हा कार्यक्रमस्थळी वळवला. तिथे प्रतिक्षालयात बसलेल्या पत्नीला सोबत घेऊन राजकोटच्या दिशेने रवाना झाले. आता हे प्रकरण सगळीकडे चर्चेचा विषय बनल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या कार्यालयातून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 8 / 9कार्यक्रम गेस्ट हाऊसवर होता, गेस्ट हाऊसची इमारत दुसऱ्या बाजूला होती. जिथे साधना सिंह बसल्या होत्या. सुरक्षेत असलेल्या पोलिसांची वाहने दुसऱ्या दिशेने उभी करण्यात आली होती. जी फिरवून परत आणण्यासाठी १० मिनिटे वेळ लागला. त्यामुळे यावर जे काही सांगितले जात आहे त्यात तथ्य नाही असं चौहान यांच्या कार्यालयाने म्हटले. 9 / 9केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांची ही छोटी चूक लोकांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना अशाप्रकारे वेळेचे नियोजन करावे लागते, त्यातून होणारी धावपळ आणि उद्भवणारा प्रसंग यावर लोकांची चर्चा सुरू आहे.