टिपू सुलतान जयंतीवरुन बेळगावात दोन गटांमध्ये तुफान राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 15:30 IST
1 / 4टिपू सुलतान जयंतीवरुन बेळगावात दोन गटांमध्ये तुफान राडा झाला. यावेळी दोन्ही गटांनी एकमेकांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. 15 नोव्हेंबरची ही घटना आहे. 2 / 4 खडक गल्लीत दोन गट भिडले. यावेळी हाणामारीसोबत झालेल्या दगडफेकीमुळे पोलीस आयुक्त व उपायुक्त जखमी झाले आहेत. 3 / 4दगडफेकीत अनेक वाहनांचेही नुकसान झाले आहे. या गटांमध्ये तरुणांचा मोठा समावेश होता. 4 / 4परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला, त्यानंतर पुन्हा जमाव भडकला आणि जमावाने पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली.