शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जगातील श्रीमंत आणि शक्तिशाली देशांपैकी एक, पण या देशाचा एकही सैनिक आतापर्यंत झालेला नाही शहीद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:24 IST

1 / 6
जागतिक पातळीवर शांततेच्या कितीही चर्चा सुरू असल्या तरी जगातील कुठल्या ना कुठल्या भागात संघर्ष हा सुरूच असतो. सीमावाद, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि इतर कारणांमुळे युद्ध, चकमकी घडत असतात. या संघर्षामध्ये हजारो सैनिकांचा मृत्यू होत असतो. मात्र जगाच्या पाठीवर असाही एक देश आहे. ज्याचा मागच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात एकही सैनिक लढाईत मृत्युमुखी पडलेला नाही.
2 / 6
या देशाचं नाव आहे स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंडकडे शक्तिशाली असं सैन्यदल आहे. मात्र त्यांचा एकही सैनिक कधी कुठल्या लढाईत हुतात्मा झालेला नाही. तसेच या देशानेही कधी कुठल्या युद्धात सहभाग घेतलेला नाही. तसेच कुठल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेले नाही.
3 / 6
निसर्गसौंदर्याने समृद्ध आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला स्वित्झर्लंड हा देश युद्ध आणि हिंसेपासून नेहमीच दूर राहतो. या देशाकडे आपलं शक्तिशाली असं लष्कर आहे. मात्र या लष्कराचा वापर केवळ देशाची सुरक्षा आणि स्वायत्तता यांचं रक्षण करण्यासाठीच केला जातो. स्विस लष्कराने कधीही कुठल्याही देशाविरोधात युद्ध लढलेलं नाही.
4 / 6
स्वित्झर्लंड हा पूर्वीपासून एक तटस्थ देश म्हणून ओळखला जातो. त्यामुळे स्वित्झर्लंडचं सैन्य कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघर्षामध्ये कधी सहभागी होत नाही. १८१५ रोजी झालेल्या व्हिएन्ना काँग्रेसनंतर युरोपमधील मोठ्या राष्ट्रांनी स्वित्झर्लंडला तटस्थ देश म्हणून मान्यता दिलेली होती. त्यामुळेच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धावेळी स्वित्झर्लंडने आपल्या देशाच्या सीमा बंद करून घेतल्या. तसेच स्वत:ला या युद्धापासून दूर ठेवले. मात्र स्वित्झर्लंडने आपल्या ३१ सैनिकांना अफगाणिस्तानमध्ये तैनात केले होते.
5 / 6
स्वित्झर्लंडचं सैन्य युद्धासाठी रणांगणात उतरलं नाही तरी त्यांच्या सैनिकांना अत्यंत कठोर प्रशिक्षण दिलं जातं. स्वीत्झर्लंडजवळ खूप भक्कम आणि अत्याधुनिक असं सैन्यदल आहे. देशाचं रक्षण आणि आपत्तींचा सामना करण्यासाठी है सैन्य कायम सज्ज असते.
6 / 6
स्वित्झर्लंडच्या सैन्यदलाचं खास वैशिष्ट्य म्हणजे स्वित्झर्लंडच्या सैन्यामध्ये महिला कुठल्याही पदावर स्वेच्छेने काम करू शकतात. येथे महिला आघाडीवर राहून सैनिक म्हणून काम करतात. येथे सैन्यदलामधील महिलांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. तसेच सैनिकांना सोईसुविधा आणि वेतन देण्याच्याबाबतीत स्वित्झर्लंड आघाडीवर आहे.