'सुपरस्टार रजनीकात देशातील एकाच नेत्याला ट्विटरवर करतात फॉलो'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:51 IST
1 / 8दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना चित्रपटातील योगदानासाठी दादासाहेब फाळके पुरस्काराने सोमवारी गौरविण्यात आले. हा पुरस्कार उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते देण्यात आले.2 / 8‘मनिकर्णिका’ व ‘पंगा’ या चित्रपटातील भूमिकांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून कंगना राणावत यांना सन्मानित करण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ‘भोसले’ या चित्रपटासाठी मनोज बाजपेयी व ‘असुरन’मधील भूमिकेसाठी धनुष यांना प्रदान करण्यात आला.3 / 8राजधानी दिल्लीतील या पुरस्कार सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे, रजनीकांत यांनी दोन दिवसांनी दोन्ही प्रमुखांची भेट घेतली. 4 / 8रजनीकांतने ट्विटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या शुभेच्छा मिळाल्याने आनंद झाल्याचे म्हटले. 5 / 8रजनीकांत यांच्यासोबत या भेटीत त्यांच्या पत्नी लता रजनीकांत ह्याही उपस्थित होत्या. दरम्यान, रजनीकांत यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार आपले गुरू दिवंगत चित्रपट निर्माते बालाचंदर यांच्यासह अनेकांना समर्पित केला आहे. 6 / 8रजनीकांत हे राजकारणात येणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आपण राजकारणात येणार नसल्याचं रजनीकांतने सांगितले. मात्र, रनजीकांत यांच्या ट्विटरचा अभ्यास केल्यास. 7 / 8ट्विटरवर देशातील केवळ एकाच राजकीय नेत्याला ते फॉलो करत असल्याचं दिसून येतं. त्यामध्ये, पीएमओच्या अधिकृत हँडलला आणि राजकीय नेता म्हणून नरेंद्र मोदींना ते फॉलो करतात. 8 / 8बॉलिवूडमधील केवळ अमिताभ बच्चन यांनाच ते ट्विटरवर फॉलो करतात. ट्विटरवर एकूण 24 जणांना रजनीकांत फॉलो करतात, त्यामध्ये बॉलीवूडचा बादशहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.