शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीची सहा वर्षे; काळा पैसा, बनावट नोटा, कॅशलेस व्यवहार, काय बदललं? धक्कादायक आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 17:09 IST

1 / 8
आज दिनांत ८ नोव्हेंबर. बरोब्बर सहा वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता देशाला संबोधित करत नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत मोदींनी सर्वांना धक्का दिला होता.
2 / 8
नोटाबंदी जाहीर करण्यामागचा मुख्य हेतू हा काळा पैसा आणि नकली नोटांना लगाम घालणे हा होता. मात्र या घोषणेला सहा वर्षे पूर्ण होत असताना मागे वळून पाहिले तर या निर्णयाने काय बदलले आणि काय नाही, याची धक्का देणारी माहिती समोर येते.
3 / 8
काळा पैसा नष्ट करणे हा नोटाबंदीचा मुख्य हेतू होता. मात्र अर्थतज्ज्ञांच्या मते हा निर्णय खूप कठोर होता. तसेच त्यामुळे केवळ ५ टक्केच काळापैसा बाहेर येऊ शकला. उर्वरित काळेधन हे सोने-चांदी आणि रियल इस्टेटच्या रूपात तसेच राहिले.
4 / 8
काळ्या धनाला लगाम घालणे, बनावट चलन अर्थव्यवस्थेतून बाहेर काढणे आणि कॅशलेस इकॉनॉमीला प्रोत्साहन देणे हा नोटाबंदी जाहीर करतानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्य हेतू होता. त्यातील किती हेतू साध्य झाले याची माहिती पुढीलप्रमाणे.
5 / 8
काळ्या पैशाला लगामा घालणे हा नोटाबंदीचा मुख्य हेतू होता. मात्र रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार सिस्टिममधून बाहेर झालेली ९९ टक्के रोख रक्कम परत आली, नोटाबंदीमुळे सुमारे १५.४१ लाख कोटी रुपयांची रोख चलनाबाहेर झाली. मात्र त्यातील सुमारे १५.३१ लाख कोटी रुपयांची रोकड ही परत आली आहे. किती काळापैसा नष्ट झाला याचा शोध घेणे कठीण आहे. मात्र तत्कालीन वित्तमंत्री पीयूष गोयल यांनी २०१९ मध्ये संसदेत दिलेल्या माहितीनुसार १.३ लाख कोटी रुपयांचा काळापैसा नष्ट करण्यात आला आहे. मात्र किमान ३ ते ४ लाख कोटी रुपयांचा काळा पैसा नष्ट होईल, अशी सरकारला अपेक्षा होता.
6 / 8
नोटाबंदीचा दुसरा हेतू हा नकली नोटांवर लगाम घालण्याचा होता. मात्र नोटाबंदीनंतर आता नकली नोटांची संख्या ही १०.७ टक्क्यांनी वाढली आहे. यामध्ये ५०० रुपयांच्या नकली नोटांमध्ये १०१.९३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २००० हजार रुपयांच्या बनावट नोटांची संख्या ५४ टक्क्यांनी वाढली आहे. एवढंच नाही तर १०,२० आणि २०० रुपयांच्या बनावट नोटांचाही सुळसुळाट झाला. २०१६ च्या नोटाबंदीवेळी एकूण ६.३२ लाख नकली नोटा पकडल्या गेल्या होत्या. तर पुढच्या चार वर्षांमध्ये १९.८७ लाख रुपयांच्या नकली नोटा पकडल्या गेल्या आहेत.
7 / 8
नोटाबंदीचा तिसरा हेतू हा देशाच्या अर्थव्यवस्थेला कॅशलेसच्या दिशेने नेण्याचा होता. मात्र नोटाबंदीच्या सहा वर्षांनंतर पुन्हा एकदा कॅशच्या माध्यमातूम न्यवहार वाढलेले दिसत आहेत. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत रोखीतील व्यवहार वाढून ३०.८८ लाख कोटींपर्यंत पोहोचले आहेत. तर ४ नोव्हेंबर २०१५ पर्यंत ही संख्या १७.७ लाख कोटी एवढी होती. मात्र यादरम् आरबीआई के मुताबिक, लोगों का नकदी में लेनदेन 21 अक्‍टूबर, 2022 तक बढ़कर 30.88 लाख करोड़ रुपये हो गया, जबकि 4 नवंबर, 2016 को यह संख्‍या 17.7 लाख करोड़ थी. हालांकि, इस दौरान डिजिटल व्यवहारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्या महिन्यात यूपीआयच्या माध्यमातून एकूण १२.११ लाख कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
8 / 8
वरील आकडेवारीवरून केवळ कॅशलेस व्यवहार वाढल्याचे दिसत आहे. मात्र कॅशलेस इकॉनॉमीचे लक्ष्य अद्याप दूर आहे. काळ्यापैशाला लगाम घालण्याचा हेतू साध्य झाला नाही. तसेच त्याचे लक्ष्य गाठणेही बाकी आहे. तसेच नकली नोटांवर नियंत्रण आणणेही पूर्णपणे शक्य झालेले नाही.
टॅग्स :Demonetisationनिश्चलनीकरणNote BanनोटाबंदीNarendra Modiनरेंद्र मोदी