वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 11:27 IST
1 / 7भटक्या कुत्र्यांचे हल्ले देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेलं होतं. आता उत्तर प्रदेश सरकारने वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांबद्दल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे सतत हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना शिक्षा करण्याचा.2 / 7हो, सतत हल्ले करणाऱ्या कुत्र्याला सीरियल ऑफेंडर ठरवून जन्मठेपेची शिक्षा केली जाणार आहे. प्रयागराजमध्ये याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. एबीसी अर्थात अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटरसाठी हा आदेश लागू झाला आहे. हिंसक श्वानांना नियंत्रणात ठेवून लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला गेला आहे.3 / 7 जर एखादा पहिल्यांदा कुणाला चावला, तर त्याला १० दिवसांसाठी एबीसी सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. त्यासाठी ज्या व्यक्तीला कुत्रा चावला, त्याला उपचार घेतल्याचे प्रमाणपत्र आधी द्यावे लागणार, नंतर संबंधित कुत्र्याला पकडून एसीबीमध्ये ठेवले जाणार.4 / 7एबीसीमध्ये त्या कुत्र्यावर नजर ठेवली जाणार. त्यानंतर त्याला मायक्रो चिप लावून सोडले जाणार आणि त्याचे वर्तन कसे आहे, कुठे फिरतोय हे बघितले जाणार. जर व्यक्तीची चुकी नसताना तो कुत्रा चावला तर त्याला चावणारा ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाणार.5 / 7तीन सदस्यीय समिती या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार. त्यात कुत्र्यांने दोन वेगवेगळ्या व्यक्तींना चावा घेतला आहे का? कोणतीही चिथावणी देता कुत्रा चावला आहे का? याची चौकशी हे पथक करणार आहे. यात पशुसंवर्धन विभागातील अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी आणि एसपीसीएचे सदस्यही असणार आहेत.6 / 7प्रयागराजमधील एबीसीमध्ये माणसांना ठेवण्यासाठी असणाऱ्या कोठडीप्रमाणेच कोठड्या तयार करण्यात आल्या आहेत. सध्या इथे १९० कुत्रे ठेवण्यात आले आहेत. त्याची काळजी घेण्यासाठी कर्मचारीही नियुक्त करण्यात आले आहे.7 / 7ज्या कुत्र्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे, त्याची सुटका त्याचवेळी होऊ शकते जेव्हा त्याला कुणीतरी दत्तक घेण्यासाठी तयार झाले असेल. यातही त्या कुत्र्याची सगळी जबाबदारी दत्तक घेणाऱ्या व्यक्तीची असेल. १० सप्टेंबर २०२५ रोजी यासंदर्भातील आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.