ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
प्राणप्रतिष्ठापनेनंतर पंतप्रधानांच्या निवासस्थानी साजरा झाला दीपोत्सव, नरेंद्र मोदींनी पेटवली रामज्योत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 20:34 IST
1 / 5अयोध्येमध्ये राम मंदिरात रामललांची प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर अयोध्येसह देशभरात ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. 2 / 5रामललांची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानामध्ये रामज्योत पेटवून दीपोत्सव साजरा केला. 3 / 5यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या निवासस्थानी रामललांच्या प्रतिमेचं पूजन केलं. 4 / 5त्यानंतर मोदींनी निवासस्थानी रामज्योत प्रज्वलित केली. 5 / 5दरम्यान, अयोध्येत प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर नरेंद्र मोगी म्हणाले होते की, अयोध्येत भव्य राम मंदिर बांधून पूर्ण झालं. आता पुढे काय? असा सवाल करत उपस्थितांसमोर नव्या भारताचा एक संकल्प मांडला. आता आपण याच वेळेपासून पुढील एक हजार वर्षांनंतरच्या भारताची पायाभरणी केली पाहिजे. मंदिर निर्मितीपासून पुढे जाऊन आता आपण सर्व देशवासियांनी या घडीपासून एक समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य भारताच्या निर्मितीची शपथ घेऊया, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले.