शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२०० किलो वजन, ५१ इंच उंची, प्रभावळीवर दशावतार, अशी आहेत रामललांच्या मूर्तीची वैशिष्ट्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2024 16:24 IST

1 / 10
अयोध्येतील राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना होणाऱ्या रामललांच्या मूर्तीची छायाचित्रे समोर आली आहेत. ही मूर्ती गर्भगृहात स्थापन करण्यात आली असून २२ जानेवारी रोजी तिची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. रामललांची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. या मूर्तीची खास वैशिष्ट्ये आज आपण जाणून घेऊयात.
2 / 10
रामललांची मूर्ती ज्या श्यामशिलेमधून घडवण्यात आली आहे तिचं आयुर्मान हजारो वर्षे आहे. तसेत ती जलावरोधीर आहे.
3 / 10
चंदनाचा लेप लावल्यानंतरही मूर्तीची चमक कमी होणार नाही
4 / 10
पायापासून ललाटेपर्यंत मूर्तीची उंची ही ५१ इंच एवढी आहे. तसेच मूर्तीचं वजन सुमारे २०० किलो आहे.
5 / 10
रामललांच्या मूर्तीमागची प्रभावळ वैशिष्ट्यपूर्ण आहे. प्रभावळीच्या दोन्ही बााजूंना सुरुवातीला हनुमंत आणि गरुडाच्या मूर्ती कोरण्यात आल्या आहेत, तर वर मध्यभागी सूर्यदेवतेची मूर्ती आहे. तर प्रभावळीर मध्ये दोन्ही बाजूला श्रीहरी विष्णूंच्या दशावतारातील अवरात कोरण्यात आले आहेत.
6 / 10
श्रीरामांच्या मूर्तीवर मुकुट आहे
7 / 10
मूर्तीचे हात गुडघ्यांपर्यंत लांब आहेत.
8 / 10
रामललांच्या मूर्तीचं मस्तक सुंदर, डोळे मोठे आणि ललाट भव्य आहे.
9 / 10
मूर्ती कमळाच्या फुलावर उभी आहे, तसेच हातात धनुष्य आहे
10 / 10
तसेच मूर्तीच्या चेहऱ्यावर पाच वर्षांच्या बालकाप्रमाणे कोमल भाव आहेत.
टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याHinduismहिंदुइझम