शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लईच भारी ज्योतिरादित्यांची 'Love Story'; पहिल्याच भेटीत पडले 'या' राजकुमारीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 15:27 IST

1 / 11
ज्योतिरादित्य शिंदेंनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर ते प्रसिद्धीच्या केंद्रस्थानी आले आहेत. ग्वाल्हेर घराण्याचे राजपुत्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांचा विवाह गुजरातमधल्या बडोद्यातील गायकवाड या मराठा राजघराण्यातील राजकुमारीशी झाला आहे.
2 / 11
12 डिसेंबर 1994मध्ये ज्योतिरादित्य शिंदे गायकवाड घराण्याची राजकुमारी असलेल्या प्रियदर्शिनी यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले.
3 / 11
1975मध्ये प्रियदर्शिनी शिंदे यांचा बडोद्याच्या गायकवाड या मराठा राजघराण्यात जन्म झाला. आशाराजे गायकवाड आणि कुंवर संग्राम सिंह त्यांचे आईवडील होत. त्यांचं प्राथमिक शिक्षण मुंबईत झालं. त्यानंतर त्यांनी सोफिया कॉलेजमधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं.
4 / 11
राजकुमारी प्रियदर्शिनी शिंदे यांचे वडील राजा प्रताप सिंह यांचे शेवटचे पुत्र होते. त्यांचे वडील कुंवर संग्राम सिंह हे राजा प्रताप सिंह यांचे तिसरे पुत्र होते. त्यांची आई नेपाळच्या राजघराण्यातली राजकुमारी होती.
5 / 11
1991मध्ये एका मित्राच्या पार्टीत ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियदर्शिनी शिंदे यांची पहिल्यांदा भेट झाली. पहिल्याच नजरेत ज्योतिरादित्य शिंदे या राजकुमारीच्या प्रेमात पडले. तेव्हा ज्योतिरादित्य शिंदे नुकतेच हॉर्वर्ड युनिव्हर्सिटीतून शिकून आले होते.
6 / 11
जवळपास तीन वर्षं त्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. त्यानंतर 12 डिसेंबर 1994ला राजकुमारी प्रियदर्शिनी यांचं ग्वाल्हेर राजघराण्यात लग्न झालं. ज्योतिरादित्य शिंदे यांची आई माधवीराजे शिंदे यांनीही प्रियदर्शिनी यांना सून म्हणून स्वीकारलेले होतं.
7 / 11
प्रियदर्शिनी 13 वर्षांच्या असतानाच त्यांची माधवीराजेंशी भेट झाली होती. प्रियदर्शिनी यांची गणना ही देशातील सर्वात सुंदर राजकुमारींमध्ये होते. वर्ष 2012मध्ये त्यांचा देशातील सर्वात सुंदर 50 महिलांमध्येही समावेश होता.
8 / 11
(फॅशन मॅगझिन सर्वेक्षणानुसार) जगातील 20 सुंदर महिलांमध्ये प्रियदर्शिनीराजे यांचा समावेश आहे. वर्ष 2008मध्ये प्रियदर्शिनींना बेस्ट ड्रेस्ड हॉल ऑफ फेम लिस्ट समाविष्ट करण्यात आलं होतं.
9 / 11
आपल्या शाही अंदाजामुळे प्रियदर्शिनी कायमच चर्चेत असतात. राजघराण्याचा पोशाख परिधान करून त्या बऱ्याचदा अनेक कार्यक्रमात दिसून येतात.
10 / 11
ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियदर्शिनी शिंदे यांना दोन मुलं असून, त्यांची नावं महाआर्यमान शिंदे आणि अनन्या राजे शिंदे अशी आहे.
11 / 11
ज्योतिरादित्य शिंदे आणि प्रियदर्शिनी शिंदे यांना दोन मुलं असून, त्यांची नावं महाआर्यमान शिंदे आणि अनन्या राजे शिंदे अशी आहे.
टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदे